युरोप, 14 ऑक्टोबर: पाश्चिमात्त्य देशात माथेफिरू लोकांनी अचानक गोळीबार करण्याच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे. बहुतांश वेळा असा हल्ला करणारे लोक हे मानसिक रुग्ण असल्याचे आढळले आहे. अमेरिका, युरोपियन देशात हे प्रमाण अधिक आहे. पिस्तूल, बंदुकीसारखी हत्यारं वापरण्याचा परवाना सहज मिळत असल्याचाही हा परिणाम आहे, असं म्हटलं जातं. नॉर्वेसारख्या शांत देशातही नुकतीच अशी घटना घडल्यानं सर्वत्र खळबळ माजली आहे. टीव्ही9 हिंदीने याबाबतचे वृत्त दिलं आहे.
नॉर्वेमधील (Norway) कॉंग्सबर्ग (Kongsberg) शहरात बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. एका अज्ञात व्यक्तीने धनुष्यबाण घेऊन गर्दीच्या ठिकाणी अचानक हल्ला (Attack)केला. त्याने सोडलेल्या बाणांमुळे (Arrows) अनेक लोकांचा बळी (Death) गेला तसंच अनेक लोक जखमी (Injured) झाले. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत संशयित हल्लेखोराला ताब्यात घेतलं असल्याची माहिती कोंग्सबर्ग शहर पोलीस दलाचे प्रमुख (Police Chief) ओयिंग आस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा- कर्जबाजारी पाकिस्तान दिवाळखोरीच्या वाटेवर; जगातील सर्वात गरीब देशांसारखी झाली परिस्थिती
या हल्ल्यानं नॉर्वेसारख्या शांत देशातील वातावरण ढवळून निघालं असून लोकांमध्ये दहशतीचं, भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Attack