• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • कर्जबाजारी पाकिस्तान दिवाळखोरीच्या वाटेवर; जगातील सर्वात गरीब देशांसारखी झाली परिस्थिती

कर्जबाजारी पाकिस्तान दिवाळखोरीच्या वाटेवर; जगातील सर्वात गरीब देशांसारखी झाली परिस्थिती

जागतिक बँकेनं (World Bank) नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात पाकिस्तानसाठी परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

 • Share this:
  कोरोना संकटामुळे (Corona Pandemic) सगळ्या जगाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. कोरोना काळात करावा लागलेला लॉकडाउन (Lockdown), त्यामुळे बंद पडलेले उद्योगधंदे, वाढलेली बेरोजगारी, महागाई तसंच कोरोना नियंत्रणासाठी कराव्या लागणाऱ्या उपाय योजनांचा खर्च यामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था पार कोलमडली. आता परिस्थिती सुधारत असली तरी हा फटका सोसल्यानंतर पुन्हा पूर्वीची स्थिती गाठण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. या सगळ्या संकटात विकसनशील देशांना (Developing Countries) सर्वाधिक फटका बसला. पाकिस्तानसारख्या दुसऱ्या देशाच्या आर्थिक मदतीवर अवलंबून असलेल्या देशाची अवस्था फारच बिकट झाली असून कर्जाच्या ओझ्याखाली हा देश पार दबला गेला आहे. जागतिक बँकेनं (World Bank) नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात पाकिस्तानसाठी परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. दैनिक भास्करनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. भारताचा नाश करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानात दारिद्र्य, अज्ञान, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, पायाभूत सुविधांची कमतरता असे प्रश्न जनतेच्या पाचवीला पूजलेले आहेत. चीन,अमेरिका आदी देशांच्या आर्थिक पाठिंब्यावर पाकिस्तानचा गाडा हाकला जात आहे. पाकिस्ताननं देशातील विकास कामांसाठी तसंच अन्य कारणांसाठी विविध देशांकडून तसंच जागतिक बँकेकडून कर्ज (Loan)घेतले आहे. हे कर्ज आता इतकं वाढलं आहे की हा देश दिवाळखोरीच्या मार्गावर वाटचाल करू लागला आहे. जागतिक बँकेनं नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार, परदेश किंवा संस्थांकडून सर्वाधिक कर्ज घेतलेल्या 10 देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश झाला आहे. त्यामुळं डेट सर्व्हिस सस्पेंशन इन्हिशिएटिव्ह (DSSI)अंतर्गत, पाकिस्तानची सर्व कर्जे निलंबित केली जाण्याची वेळ आली आहे. डेट सर्व्हिस सस्पेंशन इनिशिएटिव्ह (DSSI)अंतर्गत ज्या विकसनशील देशांची स्थिती बिकट आहे, त्यांना मिळालेली कर्जे काही काळासाठी स्थगित (Suspend) करण्यात येतात. पाकिस्तान व्यतिरिक्त बांगलादेश, इथिओपिया, घाना, केनिया, नायजेरिया, मंगोलिया, उझबेकिस्तान, अंगोला, झांबिया या देशांचा या यादीत समावेश आहे. हे वाचा- चोरांपासून रक्षणासाठी त्याने लावली कॅमेरावाली डोअर बेल, पडला 1 कोटींचा भुर्दंड या 10 देशांचे एकत्रित कर्ज 2020 च्या अखेरीस 509 अब्ज डॉलर्स होते. ही रक्कम 2019 च्या तुलनेत हे 12टक्के अधिक आहे. या 10 देशांनी जगभरातील देशांच्या कर्जाच्या 59 टक्के कर्ज घेतले आहे. त्यामुळे बहुतेक देशांनी आता या देशांना कर्ज देण्यास नकार दिला आहे. म्हणूनच ते आता कोणत्याही व्याजदराने मोठ्या प्रमाणात असुरक्षित कर्जे घेतात. याचं मोठं उदाहरण पाकिस्तान आहे. पाकिस्तान सतत सीपीईसी (CPEC) प्रकल्पाअंतर्गत चीनकडून कर्ज घेतो. या कर्जाच्या व्याजदराची कधीही सार्वजनिकरीत्या वाच्यता केली जात नाही. या कर्जाचा भार वाढत चालल्यानं 4 महिन्यांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या सरकारने चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (China Pakistan Economy Corridor) अंतर्गत घेतलेले 300 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 22 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचे आवाहन केले होते. चीनने कर्ज माफ करावे आणि सीपीईसी (CPEC) प्रकल्पाची पुनर्रचना करावी अशी पाकिस्तानची इच्छा होती. परंतु चीननं त्यासाठी स्पष्ट नकार दिल्यानं पाकिस्तान समोरचं संकट आणखी गंभीर झालं आहे. आता परदेशातून कर्ज मिळण्याचा मार्ग बंद होण्याची शक्यता असून जागतिक बँकेकडूनही कर्ज मिळण्याची शक्यता दुरापास्त आहे. त्यामुळे इम्रान खान सरकारवर दिवाळखोरी जाहीर करण्याची नाचक्की ओढवू शकते.
  First published: