
बऱ्याचदा मुलींना केसांच्या समस्यांबद्दल काळजी वाटते, परंतु रशियाच्या इर्कुत्स्क येथील रहिवासी असलेल्या अँजेलिकाचे केस तिच्या टाचांपर्यंत पोहोचतात. तिने केस न कापण्याचा निर्णय घेतला तेव्हा ती फक्त 5 वर्षांची होती. तेव्हापासून ना तिने तिचे केस कापले, ना त्याच्या पालकांनी तिच्या केसांना कात्री लावली.

20 वर्षांत, तिच्या केसांची लांबी इतकी वाढली आहे की त्यात तिचे संपूर्ण शरीर व्यापून जाते. तिला तिच्या लांब केसांचा अभिमान आहे, जरी ती त्याची काळजी घेण्यासाठी जास्त काही करत नाही. अँजेलिका म्हणते की ती तिच्या केसांवर जास्त मेहनत घेत नाही.

अँजेलिका आठवड्यातून दोनदा आपले केस धुवते, विशेष शॅम्पू आणि कंडिशनरशिवाय. मोकळ्या हवेत केस सुकू दिल्यानंतर, केसांवर कंंगवा फिरवते जेणेकरून त्यात गुंता होऊ नये.

Caters News शी बोलताना तिने सांगितले की केस विंचरताना तिला खूप काळजी घ्यावी लागते, कारण गुंता झाल्यास ते जास्त तुटतात. 28 वर्षीय अँजेलिका व्यवसायाने परिचारिका आहे आणि तिच्या केसांची काळजी घेणे तिच्यासाठी खरोखरच आव्हानात्मक आहे.

अँजेलिका हे देखील मान्य करते की हे केस सांभाळणे कधीकधी कठीण होते. पण त्या बदल्यात तिला मिळणारी प्रशंसा तिला खूप आनंदित करते. तिचे कुटुंब आणि आजुबाजूचे लोक तिला सांगतात की तिचे केस किती सुंदर आहेत आणि यामुळे तिच्या उत्साहात भर पडते.

28 वर्षीय रशियन ब्यूटी असं म्हणते की ती भविष्यातही केस कापण्याची योजना आखत नाही आहे. तिला तिच्या लांब केसांसह फोटो काढणं देखील आवडतं. तिने इन्स्टाग्रामवर फोटोशूट सुद्धा शेअर केले आहे.

ज्या सोप्या पद्धतीन ती तिचे केस हाताळते त्यानुसार हेच म्हणता येईल की तिचे सुंदर केस निसर्गाची एक अद्भुत भेट आहे. (All Photos- Instagram/@lik_anzhelik)




