जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / मेडिकल इतिहासातील पहिलीच घटना; जीवंत व्यक्तीने केलं अवयवदान, कोरोनाग्रस्त महिलेचा वाचला जीव

मेडिकल इतिहासातील पहिलीच घटना; जीवंत व्यक्तीने केलं अवयवदान, कोरोनाग्रस्त महिलेचा वाचला जीव

मेडिकल इतिहासातील पहिलीच घटना; जीवंत व्यक्तीने केलं अवयवदान, कोरोनाग्रस्त महिलेचा वाचला जीव

डॉक्टरांनी कोरोनाबाधित महिलेच्या फुप्फुसाची ट्रान्सप्लांट सर्जरी यशस्वी केली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महिलेला दोन जीवंत लोकांनी फुप्फुसाचा भाग डोनेट केला आहे. मेडिकल इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

टोकियो, 10 एप्रिल : कोरोना व्हायरसची (Coronavirus) प्रकरणं वाढत असताना एक चांगली बातमी समोर आली आहे. जपानमध्ये (Japan) डॉक्टरांनी कोरोनाबाधित महिलेच्या फुप्फुसाची ट्रान्सप्लांट (Transplant) सर्जरी यशस्वी केली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महिलेला दोन जीवंत लोकांनी फुप्फुसाचा भाग डोनेट केला आहे. हे दोन्ही डोनर महिलेचा पती आणि मुलगा आहे. मेडिकल इतिहासात पहिल्यांदा अशी घटना घडली आहे. ही महिला लवकरच पूर्णपणे बरी होईल असा दावा डॉक्टरांनी केला आहे. या सर्जरीनंतर जगभरातील डॉक्टरांसमोर जीवंत डोनर्सच्या शरीराचा भाग घेण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. सर्जरीचा भाग असलेले डॉक्टर हिरोशी डेट यांनी सांगितलं की, या सर्जरीद्वारे त्यांनी जगाला हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, जीवंत डोनर्सकडूनही ट्रान्सप्लांट करणं हा एक पर्याय आहे. रिपोर्ट्सनुसार, महिलेच्या मुलाने उजवीकडील फुप्फुसाचे सेगमेंट्स दिले आहेत. तर महिलेच्या पतीने डाव्या बाजूच्या भागासाठी मदत केली आहे. क्योटो यूनिव्हर्सिटी रुग्णालयात जवळपास 11 तास सुरू असलेली ही सर्जरी यशस्वी झाली आहे. सध्या महिला, तिचा पती, आणि मुलाची स्थिती स्थिर आहे. या सर्जरीसाठी 30 लोकांची टीम सामिल होती. महिलेला दोन महिन्यानंतर रुग्णालयातून सुट्टी मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. जीवंत डोनरचा हा पर्याय उपलब्ध झाला असला, तरी ही सर्जरी अतिशय कठिण असल्याचं सांगण्यात आलं आहे. अवयव दानासाठी डोनरला 13 मेडिकल नियम-अटी पूर्ण करणं गरजेचं असतं.

(वाचा -  घाबरू नका, पण सावध राहा! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तज्ज्ञांकडून दिलासादायक बातमी )

दरम्यान, जगभरात कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढू लागला आहे. भारतात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकड्यांनुसार, जगभरात आतापर्यंत 29 लाख 28 हजार 782 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केवळ एकट्या भारतात 1 लाख 68 हजार 467 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात