नवी दिल्ली, 8 जानेवारी : गुन्हेगारीच्या (Crime News) काही कहाण्या हैराण करणाऱ्या असतात. अशीच एक कहाणी लंडन (London) येथून समोर आली आहे. यात बॉयफ्रेंडने आपली प्रेयसी आणि तिच्या आईची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. द सनच्या रिपोर्टनुसार, लंडनमध्ये एका फ्लॅटमध्येच तरुणाने प्रेयसी आणि तिच्या आईची हत्या केली. 10 ऑक्टोबरला केली होती हत्या.. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 37 वर्षीय निकोल हर्ले ही जखमी अवस्थेत जमिनीवर होती. जवळच तिची आई पडली होती. पॅरामेडिक्स आणि पोलिसांनी तिच्या आईला वाचवण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र त्यांचा मृत्यू झाला. आरोपी प्रेमी 40 वर्षीय जेसन बेल याला निकोल आणि तिच्या आईच्या हत्येच्या आरोपाखाली कोर्टात हजर करण्यात आलं. आरोपीवर हत्याव्यतिरिक्तही अनेक गुन्हे दाखल आहेत. न्यायाधीश एलेक्सिया दुर्रान यांनी 2 फेब्रुवारी रोजी या प्रकरणात निकाल सुनावला. हे ही वाचा- संसर्गाच्या भीतीनं आईनं मुलाला गाडीच्या डिकीत कोंबलं; अमेरिकेतील कोरोना स्थिती! दोघांमधील वादातून बेलने निकोलसह तिच्या आईचीही हत्या केली. संतापाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. ऑक्टोबरमध्ये बेलविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर निकोलचा भाऊ रयानने आपली बहिणीला श्रद्धांजली वाहिली. तो म्हणाला की, गेल्या रात्रीमुळे आमचं अख्खं आयुष्य बदललं. आमच्या सुंदर बहिणीला या राक्षसाने गिळंकृत केलं. धक्कादायक म्हणजे त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे बहिणीवर अंत्यसंस्कार करण्यासाठीदेखील त्यांनी लोकांकडून मदत गोळा केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.