जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / संसर्ग होऊ नये म्हणून आईनं मुलाला गाडीच्या डिकीत कोंबलं; अमेरिकेतील कोरोना स्थिती भयावह!

संसर्ग होऊ नये म्हणून आईनं मुलाला गाडीच्या डिकीत कोंबलं; अमेरिकेतील कोरोना स्थिती भयावह!

संसर्ग होऊ नये म्हणून आईनं मुलाला गाडीच्या डिकीत कोंबलं; अमेरिकेतील कोरोना स्थिती भयावह!

Coronavirus cases in America: मुलाला कोविड-19 ची (Coronavirus) लागण झाली होती आणि महिलेला मुलाची पुन्हा तपासणी करायची होती. त्यासाठी ती मुलाला चाचणी केंद्रात घेऊन जात होती. पण, स्वत:ला संसर्ग होण्याच्या भीतीने तिने मुलाला गाडीत बसवण्याऐवजी डिकीत मागे कोंडून टाकले.

  • -MIN READ
  • Last Updated :

टेक्सास (अमेरिका), 08 जानेवारी : एक आई प्रत्येक वाईट शक्तीपासून आपल्या मुलाचे रक्षण करण्यासाठी काहीही करते. परंतु, अमेरिकेत (USA) एका आईने केलेल्या प्रकारामुळे मुलाचं आयुष्यच धोक्यात आलं होतं. अमेरिकेतील टेक्सासमधील एका महिलेने कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपल्या मुलाला गाडीच्या डिकीमध्ये कैद केले. वास्तविक, या मुलाला कोविड-19 ची (Coronavirus) लागण झाली होती आणि महिलेला मुलाची पुन्हा तपासणी करायची होती. त्यासाठी ती मुलाला चाचणी केंद्रात घेऊन जात होती. पण, स्वत:ला संसर्ग होण्याच्या भीतीने तिने मुलाला गाडीत बसवण्याऐवजी डिकीत मागे कोंडून टाकले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 41 वर्षीय सारा बीम 3 जानेवारीला कारने हॅरिस काउंटीमधील कोविड-19 चाचणी केंद्रात पोहोचली. तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने Click2houston.com ला सांगितले की, त्याला कारच्या डिकीमधून कसला तरी आवाज आला. डिकी उघडली असता त्यात एक 13 वर्षीय बालक आढळून आला. महिलेने अधिकाऱ्यांना सांगितले की, तिच्या मुलाला कोरोनाची लागण झाली होती आणि तिला स्वतःला संसर्ग होऊ द्यायचा नव्हता, त्यामुळे स्वत:च्या सुरक्षेसाठी महिलेने मुलाला गाडीच्या डिकीमध्ये बंद केलं आणि त्याला पुन्हा चाचणी केंद्रात आणलं. मुलाला झालेल्या कोविडची तिला पुन्हा खात्री करायची होती. हे वाचा -  लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात या घटनेबाबत पोलीस विभागाने सांगितले की, या आठवड्याच्या सुरुवातीला आम्हाला याबाबत माहिती मिळाली. चौकशीनंतर अधिकाऱ्यांनी महिलेच्या अटकेसाठी वॉरंट जारी केले आहे. या घटनेत बालकाला कोणतीही इजा झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे. हे वाचा -  दुधामध्ये घाला या 5 गोष्टी, व्हायरल इन्फेक्शनपासून रहाल दूर; ओमिक्रॉन-कोरोनावरही गुणकारी दरम्यान, अमेरिकेत ओमिक्रॉन प्रकारामुळे कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. संपूर्ण जगात कोविड-19 संसर्गाच्या बाबतीत अमेरिका आणि ब्रिटनची स्थिती सर्वात वाईट असल्याचे सांगितले जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात