धक्कादायक! देशात कोरोनामुळे आतापर्यंत 91 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू

धक्कादायक! देशात कोरोनामुळे आतापर्यंत 91 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू

महाराष्ट्रात बुधवारी 21 हजार करोनाचे नवीन रुग्ण आढळून आलेत तर 479 जणांचा मृत्यू झाला.

  • Share this:

मुंबई, 24 सप्टेंबर : देशात कोरोनाचे नव्यानं संसर्ग होणाऱ्यांची संख्या जरी वाढत असली तरी सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात ही आकडेवारी थोडी कमी असल्याचं आणि रिकव्हरी रेट चांगल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. गुरुवारी केंद्रीय मंत्रालयाकडून आलेल्या नवीन आकडेवारीनुसार 24 तासांत 86 हजार 506 लोकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असून देशात आतापर्यंत कोरोनाचा आकडा 57 लाखावर पोहोचला आहे.

या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जवळपास 90 आणि त्यानंतरच्या आठवड्यात 97 हजारापर्यंत दिवसाला रुग्ण वाढत होते. मात्र आज हा आकडा कमी असून केवळ 86 हजार 506 नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान देशात सध्या 9 लाख 66 हजार 382 कोरोनाग्रस्त रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. देशात कोरोनामुळे 24 तासांत 1, 129 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंतही संख्या 91 हजार 149 वर पोहोचली आहे.

हे वाचा-पावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालल्यानंतर 72 तासांत करा औषधोपचार नाहीतर...

बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग कमी होण्याचं नाव घेत नाही. उत्तर प्रदेशात एका दिवसाला साधारण 5 हजारहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. तर महाराष्ट्रात बुधवारी 21 हजार करोनाचे नवीन रुग्ण आढळून आलेत तर 479 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 12 लाख 63 हजार झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 19 हजार 476 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

अमेरिका, ब्राझीलसारख्या देशांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण कमी आलं असून भारत हा एकमेव देश आहे जिथे कोरोना साथीचा रोग सर्वाधिक वेगाने वाढत आहे. कोरोनामुळे सर्वाधिक संसर्ग झालेल्या देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत 71 लाख रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत अमेरिकेत 41 हजाराहून अधिक नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याच वेळी, 24 तासांमध्ये ब्राझीलमध्ये 32 हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 24, 2020, 10:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading