मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

महिला पडली बॉसच्या प्रेमात, सत्य समजल्यावर केला जीवघेणा हल्ला

महिला पडली बॉसच्या प्रेमात, सत्य समजल्यावर केला जीवघेणा हल्ला

आपल्या बॉसवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या महिलेला जेव्हा वस्तूस्थिती समजली, तेव्हा तिने (Female employee obsessed with her boss plans to murder her) बॉसवर हातोड्याने वार केला.

आपल्या बॉसवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या महिलेला जेव्हा वस्तूस्थिती समजली, तेव्हा तिने (Female employee obsessed with her boss plans to murder her) बॉसवर हातोड्याने वार केला.

आपल्या बॉसवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या महिलेला जेव्हा वस्तूस्थिती समजली, तेव्हा तिने (Female employee obsessed with her boss plans to murder her) बॉसवर हातोड्याने वार केला.

    लंडन, 30 नोव्हेंबर: आपल्या बॉसवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या महिलेला जेव्हा वस्तूस्थिती समजली, तेव्हा तिने (Female employee obsessed with her boss plans to murder her) बॉसवर हातोड्याने वार केला. अनेकदा लोक एकमेकांचं वागणं समजून घेताना चुकत असल्याचं आपल्याला दिसतं. विशेषतः ऑफिसमध्ये सौजन्यानं वागणारी (Gentle behavior misread with lov) व्यक्ती ही आपल्यावर प्रेमच करत आहे, असा अनेकांचा गैरसमज होतो. हा गैरसमज अनेक काळ मनात राहिल्यामुळे त्याचं एकतर्फी प्रेमात रुपांतर होतं आणि शेवटी कटू सत्य समजल्यानंतर ते सहन (Emotions of revenge) करणं अनेकांना शक्य होत नाही. त्यातूनच मग हिंसक विचार मनात येतात आणि बदल्याच्या भावनेनं व्यक्ती पेटून उठते. लंडनमधील एका कंपनीत नेमकं हेच घडलं. महिला पडली महिला बॉसच्या प्रेमात इंग्लंडमधील क्लीनर पार्कमध्ये हीदर विल्किंसन नावाची महिला क्लीनर मॅनेजर पदावर काम करत होती. ती आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसोबत प्रेमानं वागायची. त्यांना अधूनमधून त्यांचा हालहवाल विचारायची आणि गुडनाईटचा मेसेजही करायची. या मेसेजसोबत ती किसचा स्माईलीदेखील पाठवायची. याच कंपनीत काम करणाऱ्या 31 वर्षांच्या नाओमी व्हिलर नावाच्या महिलेनं या सगळ्याचा वेगळाच अर्थ घेतला. नाओमी पडली प्रेमात आपली सतत विचारपूस करणाऱ्या, सतत मेसेज पाठवणाऱ्या आणि सोबत किसची स्माईली पाठवणाऱ्या हीदरवर नाओमीचं एकतर्फी प्रेम जडलं. एक दिवस तिने ही बाब तिच्या सहकाऱ्यांना सांगितली. मात्र हीदर सर्वांसोबत चांगली वागत असून प्रत्येकालाच स्माईली पाठवत असल्याचं तिला समजलं. त्यानंतर तिने थेट हीदरला ही गोष्ट विचारली. त्यावेळी आपल्या नाओमीबाबत अशा कुठल्याही भावना नसून सर्व कर्मचाऱ्यांप्रमाणेच एक सहकारी म्हणन आपण तिच्याकडे पाहत असल्याचं हीदरने सांगितलं. हे वाचा- बॉयफ्रेंडला परत मिळवण्यासाठी रचलं खोटं लग्न, भाड्याच्या नवऱ्यासोबत केलं फोटोशूट बदल्याची भावना त्यानंतर बदल्याच्या भावनेने पेटलेल्या नाओमीनं मनोविकार तज्ज्ञांची मदत घेतली. आपण लगेचच हीदरचा हातोड्याने खून करणार असल्याचं सांगून ती बाहेर पडली. मनोविकार तज्ज्ञांनी पोलिसांना फोन करेपर्यंत ती हीदरपाशी पोहोचली होती. तिने आपल्या पर्समधून हातोडा काढला आणि हीदरवर वार करण्यासाठी तो उगारला. मात्र हीदरपाशी असणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनी तिला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. नाओमीला अटक करण्यात आली असून तिच्यावर मानसिक उपचारही सुरू करण्यात आले आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Britain, Crime, Love, Love at first sight, Police

    पुढील बातम्या