ब्रिटन, 11 मे : आपल्याला कोरोनाव्हायरस (coronavirus) होऊ नये, यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. यामुळे हात धुणं, खोकताना-शिंकताना तोंड-नाक झाकून घेणं अशा चांगल्या सवयी तर लोकांना लागल्याच शिवाय काही वाईट सवयी सुटण्यासही मदत होते आहे.
कोरोनाव्हायरसच्या भीतीनं ब्रिटनमध्ये (britain) तब्बल 3 लाख लोकांनी धूम्रपान (smoking) सोडलं आहे. तर 24 लाखांपेक्षा जास्त जणांनी धूम्रपानाचं प्रमाण कमी केलं आहे. YouGov केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. द सनने याबाबत वृत्त दिलं आहे.
हे वाचा - Coronavirus चा धोका : स्वच्छतेसह असा सुरक्षित आहार घ्या, WHO चा सल्ला
धूम्रपानामुळे फुफ्फुसांना हानी पोहोचते. कोरोनाव्हायरसही श्वसनप्रणालीवर परिणाम करतो. त्यामुळे धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाव्हायरसचा धोका आहे, असं तज्ज्ञांनी सांगितलं आणि त्याचा धसकाच जणू ब्रिटनमधील नागरिकांनी घेतला. एरवी सिगारेट सोडण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी अनेकांची ही सवय सहसा सुटत नाही. मात्र कोरोनाव्हायरसच्या भीतीनं हे शक्य झालं.
ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात,
2 टक्के स्मोकर्सनी कोरोनाव्हायरसच्या परिस्थितीनंतर धूम्रपान करणं बंद केलं.
8 टक्के लोकांनी धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न केला.
36 टक्के नागरिकांनी सिगारेट ओढणं कमी केलं आहे.
हे वाचा - कोरोनाचं केंद्र झालेल्या वुहानमधून 36 दिवसांनी पहिल्यांदाच आली वाईट बातमी
ब्रिटनमध्ये कोरोनाव्हायरसचे आतापर्यंत 215,260 प्रकरणं आहेत. तर 31,587 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे त्यामुळे त्यापासून स्वत:चा बचाव कसा करता येईल, यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे.
संकलन, संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Quit smoking, Smoking