वुहान, 11 मे : कोरोनाव्हायरचे (Coronavirus) केंद्र ठरलेल्या चीनच्या वुहान या शहरातून कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली. मात्र गेल्या एका महिन्यापासून वुहानमध्ये कोरोनाचे एकही प्रकरण समोर आले नव्हते. त्यामुळं वुहानमध्ये लॉकडाऊनही हटवण्यात आला होता. मात्र आता 36 दिवसांनंतर वुहानमधून एक वाईट बातमी येत आहे. ती म्हणजे तब्बल महिन्याभरानंतर पुन्हा एकदा वुहानमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. रविवारी वुहानमध्ये लॉकडाऊन हटवल्यानंतर पहिला कोरोना रुग्ण आढळून आला.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चीनच्या वुहानमधून कोरोनाचा उद्रेक होण्यात सुरुवात झाली. त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी कोरोनावर मात करण्यात चीनला यश आले. चीनमध्ये 82 हजार 918 कोरोनाची प्रकरणे समोर आली होती. मात्र त्यातील 78 हजारहून अधिक लोकं निरोगी होती. त्यामुळं चीनमधील सर्व शहरांतील लॉकडाऊन हटवण्यात आला होता.
वाचा-येते 30 दिवस धोक्याचे, कोरोनाबाधितांची संख्या 5.5 लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता
एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार वुहानमधील 89 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. मुख्य म्हणजे या व्यक्तीमध्ये पहिले Covid-19ची लक्षणं आढळली नव्हती. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागानं (National Health Commission) गेल्या 10 दिवसांनंतर पहिल्यांदाच देशातील रुग्णांची संख्या वाढत असल्याचे सांगितले. चीनमध्ये पुन्हा 14 नवीन प्रकरणं समोर आली आहेत.
वाचा-'या' देशात 1 जूनपर्यंत वाढवला लॉकडाऊन; पंतप्रधान म्हणतात, स्टे अलर्ट!
चीनमध्ये गेल्या एका महिन्यांत एकही मृत्यू नाही
आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार 14 रुग्णांमधील 2 रुग्ण परदेशी आहेत. गेल्या एका महिन्यापासून चीनमध्ये एकाचाही मृत्यू झाला नाही आहे. एकूण मृतांची संख्या ही 4 हजार 633 आहे. सध्या चीनमधील काही भाग वगळता इतर सर्व शहरांतील लॉकडाऊन हटवण्यात आला आहे.
वाचा-पुण्यात 69 भागात लागू होणार 7 दिवसांचं टोटल लॉकडाऊन, ही आहेत शहरं
वुहानमध्ये सर्वात आधी जाहीर केला लॉकडाऊन
चीनमध्ये सर्वात आधी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. हा लॉकडाऊन हुबई प्रांतातील वुहान या शहरात पहिल्यांदा लागू करण्यात आला. याचे कारण म्हणजे कोरोनाची सुरुवात या शहरातून झाली. मार्च अखेरीस वुहानमधील लॉकडाऊन शिथिल करण्यात आला.
संपादन, संकलन-प्रियांका गावडे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona