कीव, 13 मे : युक्रेनच्या (Ukraine) खार्किव (Kharkiv) शहरात धक्कदायक अशी घटना घडली आहे. बापलेकानं पोलिसाची कूर हत्या (Police murder) केली आहे. त्यांनी पोलिसाचं शीर धडापासून वेगळं केलं आणि इतक्यावरच ते थांबले नाहीत. तर या पोलिसांच्या शरीरातील अवयवांचे तुकडे करून शिजवून खाल्लेत आणि इतरांनाही खायला घातलेत. डेली स्टार च्या वृत्तानुसार, 42 वर्षीय मॅक्सिम कोस्तियुकोव आणि त्याचा 21 वर्षांचा मुलगा यारोस्लावला 45 वर्षांचा पोलीस अधिकारी येवेजनी झेन्या पेत्रोव यांच्या हत्येप्रकरणी 15 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हे वाचा - दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार, चॉकलेटचं आमीष दाखवून नराधमानं असा साधला डाव हे तिघंही काही महिन्यांपूर्वी एकत्र बसून दारू पित होते, त्यावेळी त्यांच्यामध्ये कशावरून तरी वादावादी झाली. यानंतर यारोस्लानं पेत्रोव यांना पाठीमागून पकडलं आणि मॅक्सिमनं त्याच्या छातीवर चाकूनं वार केले. यात पेत्रोव यांचा मृत्यू झाला. पोलिसाची हत्या केल्यानंतर हे बापलेक इथवरंच थांबले नाहीत. यारोस्वानं पेत्रोव यांचं शीर धडापासून वेगळं केलं. त्यांच्या शरीरातील हृदय, किडनी, लिव्हर आणि असे कित्येक अवयव काढून ते शिजवले. यानंतर त्यांनी ते फक्त स्वत:च खाल्ले नाहीत तर शेजारी राहणाऱ्या सर्वांना खायला घातलं. मात्र या लोकांना हे मांस कसलं आहे, याची माहिती नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली. हे वाचा - लॉकडाऊनमध्ये दारूची पार्टी पोहोचली मर्डरपर्यंत, चखण्यामुळे केले मित्रावरच वार कोस्तियुकोवच्या घरातून पेत्रोव यांचं शरीर ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी सांगितलं की, पोस्टमॉर्टेमध्ये त्यांच्या शरीरातील बहुतेक अवयव गायब होते. यारोस्वालनं आपण पेत्रोवचं मांस खाल्ल्यानं आजारी पडल्याची कबुलीही पोलिसांसमोर दिली. कायदेतज्ज्ञ ओक्साना कर्नाउख यांनी कोर्टात सांगितलं की, युक्रेनच्या संविधानाच माणसांची हत्या करून खाण्याबाबत शिक्षेची तरतूद नाही. त्यामुळे यांना फक्त हत्येची शिक्षा दिली जाऊ शकते. यामुळे इतकं क्रूर कृत्य करूनही या बापलेकाला फक्त तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.