दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार, चॉकलेटचं आमीष दाखवून नराधमानं असा साधला डाव

दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार, चॉकलेटचं आमीष दाखवून नराधमानं असा साधला डाव

घरातील लोक शेतात गेल्याची संधी साधून आरोपीने दुपारच्या सुमारास शेजारील सात आणि आठ वर्षीय मुलींना चॉकलेटचं आमिष दाखवत आपल्या घरी बोलावलं.

  • Share this:

नागपूर, 13 मे: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र हाहाकार उडाला असताना नागपूर जिल्ह्यात अत्यंत घृणास्पद घटना समोर आली  आहे. चॉकलेटचे आमीष दाखवून एका नराधमानं दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. कन्हान पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौदा तालुक्यातील सालवा गावात ही घटना आहे. पीडित मुली सख्ख्या बहिणी असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा....भीषण अपघात: बसवर आदळली भरधाव कार, बड्या उद्योगपतीचा मुलगा जागेवरच ठार

घरातील लोक शेतात गेल्याची संधी साधून आरोपीने दुपारच्या सुमारास शेजारील सात आणि आठ वर्षीय मुलींना चॉकलेटचं आमिष दाखवत आपल्या घरी बोलावलं. नंतर दोघांवर लैंगिक अत्याचार केला. आरोपीनं दोन दिवस मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित मुलींनी ही बाब दोन्ही आपल्या पालकांना सांगितली. याप्रकरणी कन्हान पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपी तुळशीराम श्यामराव कारेमोरे (वय-54) या नराधमाला अटक केली आहे. पुढील तपास ठाणे अमंलदार अरुण त्रिपाठी करत आहेत.

दुसरीकडे, दोन दिवसांपूर्वी अशीच एक घटना उघडकीस आली होती. गोव्यात अवघ्या तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे या घटनेतील आरोपी अल्पवयीन आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून बालसुधारगृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे. मडगाव येथील एका मोठ्या बांधकाम प्रकल्पात सेंट्रींगचे काम करणाऱ्या कामगारांच्या वस्तीत मानवतेला काळिमा फासणारी ही घटना घडली आहे.

हेही वाचा.. भाजप नेत्याची लॉकडाऊनमध्ये पोलिस आणि वाळू तस्करांसोबत रंगली ओली पार्टी!

घटनेला अशी फुटली वाचा...

चिमुरडी झोपडीबाहेर एकटी खेळत होती. तिच्याजवळ कोणी नाही याचा फायदा घेत नराधमाने तिला दुसऱ्या एका झोपडीत नेलं. तिथं त्यांन तिच्यावर अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी चिमुरडीला रक्तस्त्राव झाला. तिला तातडीने रुग्णालयात आणलं असता तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. सध्या चिमुरडीवर उपचार सुरु आहेत.

पीडिता अज्ञान असल्याने आरोपीपर्यंत कसं पोहोचायचं असा प्रश्न गोवा पोलिसांना पडला होता. पोलिसांनी या कामात बायलाचो एकवट संघटनेची मदत घेतली.

संघटनेच्या अध्यक्षा आवदा व्हिएगस यांनी पीडितेची भेट घेतली. तिला घटनेबाबत विचारलं असता चिमुरडीने चित्र काढून तिच्यावर झालेला प्रसंग कथन केला. हे पाहून आवदा व्हिएकस यांच्यासह पोलिसही सून्न झाले आहेत. या प्रकाराबाबत आवदा व्हिएगस यांनी चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांनी या घटनेतडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

First published: May 13, 2020, 4:25 PM IST

ताज्या बातम्या