लॉकडाऊनमध्ये दारूची पार्टी पोहोचली मर्डरपर्यंत, चखण्यामुळे केले जीवाभावाच्या मित्रावरच सपासप वार

लॉकडाऊनमध्ये दारूची पार्टी पोहोचली मर्डरपर्यंत, चखण्यामुळे केले जीवाभावाच्या मित्रावरच सपासप वार

दारूपायी ऐवढा आंधळा झाला की सच्चा दोस्तालापण विसरला.

  • Share this:

तामिळनाडू, 13 मे : देशात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. अशात हा महामारीचा वाढता प्रसार रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून देश लॉकडाऊन आहे. यादरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद आहेत. परंतू लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात दारू विक्रीसाठी परवाणगी देण्यात आली आणइ मद्यप्रेमींमध्ये आनंदी आनंद पसरला. पण याच दारूमुळे हत्येचा एक भयानक प्रकार समोर आला आहे.

दारू पिण्याचा प्लान झाला आणि त्यामध्ये एक मित्र चखणा घेऊन येणार होता. पण त्याने वचन दिल्याप्रमाणे चाखणा आणायचा विसरल्यामुळे त्याच्याच मित्रांनी थेट हत्या केली आहे. अवघ्या चखण्यामुळे मित्राची हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तामिळनाडूमधील चेंगळपुरा जिल्ह्यातील गुडवन्चेरी गावात एका 38 वर्षीय व्यक्तीनं त्याच्या 43 वर्षीय मित्राला चाकूनं ठार मारलं आहे. कारण त्याने दारू पिण्याची व्यवस्था केली पण चखणा आणायचा विसरला. मिळालेल्या माहितीनुसार, विनयगाम असं आरोपीचं नाव असून त्याला अद्याप पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाही.

15 दिवसांची चिमुकली झाली पोरकी, तरुण वयातच पोलीस कॉन्स्टेबलने केली आत्महत्या

दोन्ही मित्र रिअल इस्टेट व्यवसायात दलाल म्हणून काम करायचे आणि टॅक्स चालवायचे. अधिक उत्पन्नासाठी ते फुलंदेखील विकत असत. लॉकडाऊन दरम्यान तामिळनाडूमध्ये दारूची दुकानं उघडल्यानंतर या दोघांनी पार्टीचा बेत आखला. ठरल्याप्रमाणे, विनयगामला दारू खरेदी केली आणि मित्र वासूला चखण्यासाठी चिकन आणि मासे आणण्यास सांगितले. विनयगामने वासूला पार्टीसाठी शेतात बोलावलं.

Monsoon 2020 आला रे! या तारखेला देशात होणार आगमन, हवामान खात्याचा अंदाज

जेव्हा ते दारू पिण्यासाठी बसले तेव्हा आपण चखणा आणला नसल्याचं वासूने सांगितलं. हे ऐकून विनयागाला खूप राग आला आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वाद इतका टोकाला गेला की, विनयगने वासूनेवर थेट चाकूने वार केले आणि घटनास्थळापासून फरार झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वासूचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवला आहे. तर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून आरोपी मित्राचा शोध सुरू आहे.

First published: May 13, 2020, 12:40 PM IST
Tags: murder

ताज्या बातम्या