गॅस स्टेशनवर होतायत भांडणं ट्रक ड्रायव्हर उपलब्ध नसल्याचा भुर्दंड ब्रिटनमधील सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत आहे. बाटलीभर पेट्रोलसाठी नागरिक एकमेकांमध्ये भांडत असल्याचं चित्र आहे. वाहनांमधील पेट्रोल संपलं असल्यामुळे नागरिक बाटल्या घेऊन पंपावर गर्दी करत आहेत. बाटलीभर पेट्रोल मिळावं आणि आपलं वाहन किमान घरापर्यंत नेता यावं, यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत.Folks following on from my previous post relating to someone likely to be killed soon in this fuel madness; here is a man with what is believed to be a knife threatening another motorist I’m informed that this incident occurred in Welling! #MADNESS♂️pic.twitter.com/jFvSUc3Ma3
— Norman Brennan (@NormanBrennan) September 28, 2021
ब्रेक्झिटमुळे ड्रायव्हर मिळेनात ब्रेक्झिटची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी ब्रिटनमधील बहुतांश ट्रक ड्रायव्हर हे इतर युरोपीय देशांमधून येत असत. मात्र ब्रेक्झिटनंतर त्या सर्वांना आपापल्या मायदेशी परत जावं लागलं. तर कोरोना काळात आजारी पडल्यामुळे अनेक ड्रायव्हर्सनी काम सोडलं आहे. आकर्षक पगाराचं आकर्षण कंपन्या देत असूनही ब्रिटनमध्ये ट्रक ड्रायव्हर मिळत नसल्याचं चित्र आहे. गेल्या आठवड्यात ब्रिटनमधील सुपर मार्केट ओस पडत असल्याचं चित्र होतं. आता ही परिस्थिती अधिकच गंभीर झाली असून सुपरमार्केटच्या जोडीला आता पेट्रोल, डिझेल आणि गॅसची कमतरता जाणवू लागली आहे. हे वाचा - जमिनीखाली न्यूक्लियर बंकरमध्ये आहे आलिशान सुविधांचं पर्यटनस्थळ पाहा PHOTOS ब्रिटीश सैन्य चालवणार ट्रक ब्रिटीश सैन्याला तातडीने ट्रक ड्रायव्हिंगच्या कामासाठी उतरवणार असल्याची घोषणा ब्रिटन सरकारने गेल्या आठवड्यात केली होती. अद्याप या घोषणेची पूर्तता करण्यात आलेली नाही. यासाठीची तांत्रिक प्रक्रिया सुरू असून लवकरच ब्रिटीश सैनिक ट्रक चालवत असल्याचं चित्र दिसेल, असं सरकारमधील सूत्रांनी सांगितलं आहे.Meanwhile in the UK, petrol station queue fights continue. pic.twitter.com/ufssAlQFBG
— Mark Walker (@MarkWL20) September 28, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Britain, Petrol and diesel