Home /News /sport /

EURO 2020: मैदानात कोसळलेल्या एरिक्सनसाठी कॅप्टन ठरला देवदूत! सर्वांच्या धावपळीमुळे वाचला फुटबॉलपटूचा जीव

EURO 2020: मैदानात कोसळलेल्या एरिक्सनसाठी कॅप्टन ठरला देवदूत! सर्वांच्या धावपळीमुळे वाचला फुटबॉलपटूचा जीव

डेन्मार्कचा कॅप्टन सायमन केजेर (Simon Kjaer) यामध्ये आघाडीवर होता. त्याने तातडीने मेडिकल टीमची मदत मागितली. त्यामुळे एरिक्सनवर (Christian Eriksen) उपचार सुरू झाले.

    मुंबई, 12 जून : संपूर्ण क्रीडा विश्वाच्या काळजाचा ठोका शनिवारी रात्री घडलेल्या एका भयंकर घटनेनं चुकला. युरो कप फुटबॉल स्पर्धेतील (EURO 2020) डेन्मार्क विरुद्ध फिनलँड (Denmark vs Finland) मॅचमध्ये ती घटना घडली. या मॅचमध्ये डेन्मार्कचा फुटबॉलपटू ख्रिश्चियन एरिक्सन (Christian Eriksen) मैदानातच कोसळला. तो कोसळला तेव्हा त्याची प्रकृती गंभीर होती. त्याच्यावर तातडीने करण्यात आलेल्या उपचारामुळे त्याचा जीव वाचला आहे. एरिक्सन आता हॉस्पिटलमध्ये असून त्याची प्रकृती स्थिर आहे. कॅप्टन ठरला देवदूत! डेन्मार्कची राजधानी कोपनहेगेनमध्ये चुरशीची मॅच सुरू असताना 43 व्या मिनिटाला त्यांचा 29 वर्षाचा फुटबॉलपटू एरिक्सन मैदानात कोसळला. त्यापूर्वी संपूर्ण जोशात खेळणारा एरिक्सन मैदानात कोसळताच त्याच्या मदतीला डेन्मार्कचे सर्व खेळाडू धावले. डेन्मार्कचा कॅप्टन सायमन केजेर (Simon Kjaer) यामध्ये आघाडीवर होता. त्याने तातडीने मेडिकल टीमची मदत मागितली. त्यामुळे एरिक्सनवर उपचार सुरू झाले. बेशुद्ध पडलेला एरिक्सन आवंढा गिळणार नाही, याची खबरदारी घेतली. एरिक्सनच्या भोवती कडं करण्याची सूचना त्याने डेन्मार्कच्या खेळाडूंना केली. त्यानंतर या घटनेचा मोठा धक्का बसलेल्या एरिक्सनच्या पत्नीचे सांत्वन केले. इतकेच नाही तर या घटनेनंतर काही वेळातच ‘शो मस्ट गो ऑन’ या तत्वानुसार तो डेन्मार्कच्या टीमला घेऊन पुढची मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरला. फिनलँडचा विजय ख्रिश्चियन एरिक्सन बाबत घडलेल्या घटनेचा फटका डेन्मार्कच्या टीमला पुढील मॅचमध्ये बसला. या घटनेमुळे त्यांच्या खेळाडूंची एकग्रता भंग पावली. त्याचा फायदा घेत फिनलँडने डेन्मार्कचा 1-0 ने पराभव केला. फिनलँडकडून पोहंजापालोने 59 व्या मिनिटाला मॅचमधील एकमेव गोल केला. EURO कपमधील काळजाचा ठोका चुकवणाऱ्या त्या घटनेनंतर मुंबई इंडियन्सचं Tweet Viral प्रमुख स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणाऱ्या फिनलँडने बलाढ्य डेन्मार्कला पराभूत करुन खळबळजनक विजयाची नोंद केली. मात्र फिनलँडच्या विजयापेक्षाही एरिक्सनचा जीव वाचवण्यासाठी धावपळ करणारा डेन्मार्कचा कॅप्टन सायमन केजेर या मॅचचा हिरो होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Euro 2021, Sports

    पुढील बातम्या