मुंबई, 12 जून : युरो 2020 (EURO 2020) डेन्मार्क आणि फिनलँडच्या (Denmark vs Finland) मॅचमध्ये भयंकर घटना घडली आहे. मॅच सुरू असताना डेन्मार्कचा ख्रिश्चन एरिक्सन (Christian Eriksen) मैदानातच कोसळला. एरिक्सन याची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. ख्रिश्चन मैदानात कोसळल्यानंतर लगेचच डेन्मार्कची मेडिकल टीम मैदानात आली आणि त्याला प्रथमोपचार देण्यात आले.
A footage showing the exact moment Christian Erickson collapsed on the pitch #EUROS2020 #Euro2021 pic.twitter.com/l3flVpnlcS
— Boy Child. (@boychild01) June 12, 2021
The UEFA EURO 2020 match in Copenhagen has been suspended due to a medical emergency.
— UEFA EURO 2024 (@EURO2024) June 12, 2021
एरिक्सन मैदानात कोसळल्यानंतर स्टेडियममध्येही भयाण शांतता पसरली. तसंच सगळे जण एरिक्सनसाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान एरिक्सन मैदानातच कोसळल्यानंतर युरो कपचा हा सामना स्थगित करण्यात आला आहे. एरिक्सन याला हृदय विकाराचा धक्का आल्याचा प्राथमिक अंदाज आहे, पण याबाबत अजून अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. एरिक्सन मैदानात पडल्यानंतर खेळाडू आणि प्रेक्षकांनाही रडू कोसळलं.