Home /News /videsh /

फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा इमॅन्युएल मॅक्रॉन, मरीन ले पेन यांचा पराभव करत जिंकली निवडणूक

फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा इमॅन्युएल मॅक्रॉन, मरीन ले पेन यांचा पराभव करत जिंकली निवडणूक

फ्रान्समध्ये राष्ट्रपति इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली आहे. आता दुसऱ्यांदा ते फ्रान्सच्या राष्ट्रपती पदावर विराजमान होणार आहेत. इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अत्यंत उजव्या विचारांच्या नेत्या मरीन ले पेन (Marine Le Pen) यांना मोठ्या अंतराने हरवले.

पुढे वाचा ...
  पॅरिस, 25 एप्रिल : फ्रान्समध्ये राष्ट्रपति इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली आहे. आता दुसऱ्यांदा ते फ्रान्सच्या राष्ट्रपती पदावर विराजमान होणार आहेत. इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अत्यंत उजव्या विचारांच्या नेत्या मरीन ले पेन (Marine Le Pen) यांना मोठ्या अंतराने हरवले. मॅक्रॉन यांना 58 टक्के मते मिळाली. तर पेन यांना फक्त 42 टक्के मते मिळाली. फ्रान्समध्ये रविवारी राष्ट्रपतीपदासाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपन्न झाले. तत्पूर्वी, मरीन ले पेन यांनी रविवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव स्वीकारला. त्यांनी विद्यमान अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना विजयी म्हणून स्वीकारले. पेन म्हणाल्या की, अध्यक्षीय निवडणुकीत त्यांची अभूतपूर्व कामगिरी "स्वतःमध्येच एक जबरदस्त विजय" दर्शवते. फ्रान्समधील विविध संस्था मॅक्रॉन यांच्या विजयाचा अंदाज वर्तवत होत्या. मागच्या वेळेस सुद्धा मॅक्रॉन यांनी पे यांचा पराभव केला होता. तर यावेळी मरीन ले पेन या तिसऱ्यांदा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरल्या होत्या. ओपिनियन पोलमध्ये अनेक फ्रेंच नागरिकांनी अध्यक्ष म्हणून त्यांची प्रशंसा केली. कोविड-19 महामारी आणि युक्रेन संघर्ष यासारख्या मोठ्या जागतिक संकटांना तोंड देण्यासाठी ते या पदासाठी योग्य मानले जात होते. इतिहास रचल्यानंतर, इमॅन्युएल मॅक्रॉन, पत्नी ब्रिजिट आणि त्यांच्या मुलांसह, आयफेल टॉवरजवळील चॅम्प डी मार्सवर सजवलेल्या मंचावर पोहोचले. यानंतर त्यांनी जनतेला संबोधित केले. ते म्हणाले की, 'मला एक निष्पक्ष समाज हवा आहे. असा समाज जिथे पुरुष आणि महिलांमध्ये समानता असेल. आगामी वर्ष कठीण असतील. मात्र, ते ऐतिहासिक असतील. आपल्या नव्या पीढिसाठी सोबत येऊन काम करावे लागेल, असेही आवाहनही त्यांनी यावेळी केले. तर पुढच्या पाच वर्षांसाठी तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला, त्यासाठी तुम्हाला धन्यवाद' असेही ते म्हणाले. हेही वाचा - Pulwama मध्ये चकमक; LeT च्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा; डेप्युटी कमांडरही ठार
  मॅक्रॉन यांचा प्रवास -
  मॅक्रॉन यांनी फ्रान्समधील इकोले नॅशनल डी'अॅडमिनिस्ट्रेशन या उच्चभ्रू शाळेत शिक्षण घेतले. ते आधी वरिष्ठ सरकारी अधिकारी होते. त्यानंतर काही वर्षे रॉथस्चाइल्डमध्ये बँकर म्हणून काम केले. त्यानंतर ते समाजवादी राष्ट्राध्यक्ष फ्रान्सिस ओलांद यांचे आर्थिक सल्लागार बनले. 2014 ते 2016 या काळात ओलांद यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले. ब्रिटिश पंतप्रधानांनी दिले शुभेच्छा - ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही मॅक्रॉन यांचे अभिनंदन केले आहे. बोरिस जॉन्सन यांनी ट्विट केले की, 'फ्रान्स हा आपला सर्वात जवळचा आणि महत्त्वाचा मित्र देश आहे. आपल्या दोन्ही देशांसाठी आणि जगासाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवर मी एकत्र काम करत राहण्यास उत्सुक आहे.  जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ यांनी मॅक्रॉनसोबतचा एक फोटो शेअर केला. त्यांनी लिहिले की, आम्ही एकमेकांना सहकार्य करत राहू याचा मला आनंद आहे. त्याच वेळी, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले - कॅनडा आणि फ्रान्ससाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम सुरू ठेवण्यास उत्सुक आहे. भारत-फ्रान्स संबंध - भारताचे फ्रान्सशी चांगले संबंध आहेत. आजवर फ्रान्सचे कोणतेही सरकार भारतविरोधी राहिलेले नाही. मॅक्रॉन यांनी त्यांच्या रॅलींमध्ये स्पष्ट केले आहे की त्यांच्या अजेंडावर भारताला प्रथम प्राधान्य आहे. UN मध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वाला फ्रान्सने नेहमीच पाठिंबा दिला आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: France, President

  पुढील बातम्या