Home /News /national /

Pulwama मध्ये चकमक; LeT च्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा; डेप्युटी कमांडरही ठार

Pulwama मध्ये चकमक; LeT च्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा; डेप्युटी कमांडरही ठार

पुलवामा जिल्ह्यात (Pulwama district) रविवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबा (लष्कर) (Lashkar-e-Taiba) या प्रतिबंधित संघटनेच्या डेप्युटी कमांडरसह तीन दहशतवादी ठार झाले.

    श्रीनगर, 25 एप्रिल: Jammu Kashmir: जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पुलवामा जिल्ह्यात (Pulwama district) रविवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबा (लष्कर) (Lashkar-e-Taiba) या प्रतिबंधित संघटनेच्या डेप्युटी कमांडरसह तीन दहशतवादी ठार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्करचा डेप्युटी कमांडर आरिफ हजर (Arif Hazar) उर्फ ​​रेहान (Rehan)अशी त्याची ओळख आहे. तर यात श्रीनगरमधील 17 वर्षीय तरुणाचा समावेश असून जो 16 एप्रिलपासून बेपत्ता होता. तर तिसरा दहशतवादी पाकिस्तानचा 'हक्कानी' म्हणून ओळखला जातो. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पाहू भागात दहशतवाद्यांच्या लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी तेथे घेराव घातला आणि शोध मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. यानंतर सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईने चकमक सुरू झाली. या चकमकीत आतापर्यंत तीन दहशतवादी ठार झाल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं. काश्मीर रेंजचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी ट्विट केलं की, लष्करचा टॉप कमांडर (बासित) याचा डेप्युटी आरिफ हजर उर्फ ​​रेहान पुलवामा चकमकीत ठार झाला आहे. मशिदीसमोर पोलीस निरीक्षक परवेझ, एसआय अर्शीद आणि एका मोबाईल दुकानदाराच्या हत्येमध्ये त्याचा सहभाग आहे. श्रीनगर शहरात त्याच्यावर अनेक एफआयआर दाखल आहेत. इतर दोन दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी जीएनएसला पुष्टी केली की मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये बाबा डेंब (खन्यार) च्या नथीश शकील वाणीचाही समावेश आहे. 16 एप्रिल रोजी दुपारी जोहरच्या नमाजासाठी तो बाहेर गेला होता आणि तेव्हापासून तो बेपत्ता होता, जेव्हा कुटुंबानं त्याला परत येण्याचे आवाहन केलं होतं. मात्र त्यानंतर तो दहशतवादी गटात सामील झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. काश्मीरमध्ये 24 तासांतील ही दुसरी चकमक होती. याआधी शनिवारी कुलगाममध्ये सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक झाली होती. यामध्ये सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवाद्यांना ठार केलं. दोन दिवसांत खोऱ्यात वेगवेगळ्या चकमकीत 6 दहशतवादी मारले गेले आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Jammu and kashmir, Terrorist attack

    पुढील बातम्या