नवी दिल्ली, 21 डिसेंबर : एलोन मस्क यांनी ट्विटर ही सोशल मीडिया कंपनी विकत घेतल्यापासून काहीना काही गोंधळ सुरूच आहे. नोकर कपात, तसेच कर्मचाऱ्यांचा पगारात कपात अशा अनेक गोष्टींमुळे ट्वीटरचे नवे मालक पुन्हा चर्चेत आले आहेत. दरम्यान या सगळ्यांवर एलोन मस्क यांनी एका सर्वेक्षणाद्वारे सांगितले आहे की ते सीईओ पद सोडणार आहेत. ते म्हणाले की, ट्विटरवर झालेल्या पोलमध्ये बहुतेक युजर्सनी सीईओ पदावरून हटवण्याच्या बाजूने मत दिले आहे, त्यानंतर मी या जबाबदारीतून मुक्त होण्याचा विचार करत असल्याचे ते म्हणाले.
एलोन मस्क यांनी ट्विटरवरच एक सर्वेक्षण केले होते, ज्यामध्ये त्यांनी या कंपनीचे सीईओ पद सोडायचे का असे विचारले होते. या पोलमध्ये मोठ्या संख्येने युजर्सनी भाग घेतला आणि 58 टक्के युजर्सनी होय असे उत्तर दिले. म्हणजे बहुतेक लोक मस्क यांचे सीईओ पद सोडण्याच्या बाजूने होते. तर 42 टक्के युजर्सचा असा विश्वास होता की मस्क यांनी अद्याप सीईओ पदावर राहावे. सध्या पोलमध्ये पराभूत झाल्यानंतर मस्क यांनी आता ट्विटरचे सीईओ पद सोडणार असल्याचेही म्हटले आहे.
हे ही वाचा : Appleच्या ‘या’ डिव्हाइसवरून Ex-बॉयफ्रेंड ठेवत होता नजर, महिलेनं थेट कंपनीवरच केली केस
मस्क म्हणाले की, ट्विटरच्या सीईओचे काम नीटपणे हाताळणारा कोणी सापडताच मी हे पद सोडेन. आता खूप झाले, ही जबाबदारी सोडण्याची वेळ आली आहे. यानंतर, मी फक्त सॉफ्टवेअर आणि सर्व्हर टीमचे काम पाहणार आहे. मस्क यांनी ट्विटरवर केलेल्या सर्वेक्षणात विचारले होते की त्यांनी सीईओपदी राहायचे की नाही, त्यांच्या विरोधात जास्त मते पडल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.
नेमका काय होता हा पोल?
एलॉन मस्क यांनी दोन दिवसांपूर्वी, अर्थात 19 डिसेंबर रोजी एलॉन मस्क यांनी एक पोल ट्विटरवर सुरू केला होता. अशा प्रकारचे पोल मस्क यांनी याआधीही अनेकदा घेतले आहेत. त्या त्या वेळी आलेल्या निकालांवर मस्क यांनी लगेच किंवा कालांतराने अंमलबजावणीही केली आहे.
हे ही वाचा : तुम्हीही फोनचं ब्ल्यूटूथ कायम ऑन ठेवता? मग असं राहा ब्लूबगिंगपासून सुरक्षित
त्यामुळेच या पोलवर जोरदार चर्चा सुरू झाली होती. कारण या पोलमध्ये मस्क यांनी आपण पायउतार व्हावं का? असा प्रश्न विचारला होता. “मी ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार व्हायला हवं का? या पोलचा येणारा निकाल मला मान्य असेल, मी तो पाळेन”, असं एलॉन मस्क यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.