इस्लामाबाद, 25 मे : पाकिस्तानमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र पाककडे कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पैसे नाही आहेत. एकीकडे गरिबी आणि उपासमार यामुळं पाकची कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेनं पाकला मोठी मदत केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकला 60 लाख डॉलर देण्याची घोषणा केली आहे.
पंतप्रधान इम्रान खान यांनी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या पाकिस्तानला वाचवण्यासाठी जगभरातून मदत मागितली होती. पाकिस्तानमधील अमेरिकेचे राजदूत पॉल जोन्स यांनी एका व्हिडीओ संदेशात म्हटले आहे की, अमेरिकेची ही मदत पाकिस्तानमधील कोरोनाव्हायरसच्या गंभीर रूग्ण असलेल्या रूग्णालयात कार्यरत आरोग्यसेवांना देण्यात आली आहे.
अमेरिकेनं दिलेला निधी हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी वापरला जाणार आहे. याशिवाय हॉटस्पॉट परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या चाचणीसाठी मोबाईल लॅबची सोयही करण्यात येणार आहे. यामुळं कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होईल. त्याचबरोबर पॉल जोन्स यांनी पाकिस्तानमधील जनतेला ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा दिल्या. आज रमजान उल मुबारक महिन्याचा 30 वा रोजा रोजेदारांनी पूर्ण केला.
वाचा-सावध राहा! महाराष्ट्रात 71 टक्के कोरोनाग्रस्त, सर्वाधिक रुग्ण लक्षणं विरहित
“I would like to congratulate all Pakistanis on the completion of Ramazan,” said #AmbJones in his #EidUlFitr video. The Ambassador also announced a new U.S. contribution of $6 million to strengthen Pakistan’s response to coronavirus. #EidMubarak #HappyEid #Partners4Prosperity pic.twitter.com/8C6F3YG6AF
— U.S. Embassy Islamabad (@usembislamabad) May 24, 2020
वाचा-कपड्यावर येताच कोरोनाव्हायरस नष्ट होणार; शास्त्रज्ञांनी सुचवला उपाय
दरम्यान, याआधी वर्ल्ड बॅंककडून पाकिस्तानला 50 कोटी डॉलरची मदत मिळाली होती. हा निधी पाकनं आरोग्य सेवा आणि शिक्षणासाठी वापरला असल्याचे सांगितले. पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील सिंध प्रांतात सर्वात जास्त 21 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. तर पंजाबमध्ये 19 हजार 557, खैबर-पख्तूनख्वामध्ये 7 हजार 685, बलूचिस्तानमध्ये 3 हजार 306, इस्लामाबादमध्ये 1 हजार 592, गिलगित-बाल्तिस्तानमध्ये 619 आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या काश्मीरमध्ये 197 प्रकरणं समोर आली आहेत. आतापर्यंत 17 हजार 198 लोकं निरोगी झाली आहेत. तर, 4 लाख 73 हजार लोकांच्या चाचण्या झाल्या आहेत.
वाचा-जूनमध्ये दिसणार कोरोनाचा सर्वात धोकादायक टप्पा, तज्ज्ञांनी भारताला दिला इशारा