नवी दिल्ली, 25 मे : मास्क जसा आपल्याला संक्रमणापासून वाचवतो, तसंच वापरलेल्या मास्क नीट हाताळला नाही तर संक्रमणाचा धोकाही असतो. अगदी असंच आपल्या कपड्यांच्या बाबतीतही आहे. याचा सर्वात जास्त धोका आहे तो रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना. त्यांनी कितीही सुरक्षात्मक पीपीई कपड्यांचा वापर केला तरी त्यांना हा धोका असतोच. मात्र आता अमेरिका इंडियाना युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी कपड्यांमुळे होणारा संक्रमणाचा धोका कसा टाळता येईल, यावर उपाय सुचवला आहे.
संशोधकांनी इलेक्ट्रोस्टेटिकचा कोरोनाव्हायरसवर काय प्रभाव होतो याचा अभ्यास केला. इलेक्ट्रोस्युटिकल्समध्ये माणसांना हानी न पोहोचवणारे कमजोर इलेक्ट्रिक फिल्डचा वापर काही आजार बरे करण्यासाठी केले जातात. शास्त्रज्ञांच्या मते, जर कपड्यांवर इलेक्ट्रिक फिल्ड निर्माण केलं, तर त्यावरील व्हायरस नष्ट होऊ शकतो.
हे वाचा - कोरोनाची लक्षणं असल्याशिवाय टेस्टिंगच होणार नाही, काय आहे ICMR ची नवी गाईडलाईन
शास्त्रज्ञांनी करंट निर्माण करणारा एक कापड तयार केलं आहे. या करंटमुळे त्या कपड्यावरील व्हायरसचा नाश होईल आणि संक्रमण पसरण्यापूर्वीच कपडा व्हायरसमुक्त होईल.
या संशोधनाचे प्रमुख अभ्यासक आणि इंडियाना सेंटर फॉर रिजनरेटिव्ह मेडिसीन अँड इंजिनीअरिंगचे संचालक चंदन सेन आणि त्यांच्या टीमने इलेक्ट्रॉस्युटिकल कापडाला पीपीई किटसाठी अधिक उपयोगी म्हटलं आहे.
हे वाचा - जूनमध्ये दिसणार कोरोनाचा सर्वात धोकादायक टप्पा, तज्ज्ञांनी भारताला दिला इशारा
कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी कपड्यांवर अभ्यास तर सुरू आहे, मात्र सर्वात जास्त भर दिला जातो तो मास्कवर. मास्कवर व्हायरसचा नाश कसा होईल आणि त्याला हात लावल्यानंतर संक्रमण पसरणार नाही, असा मास्क बनवण्याची तयारी शास्त्रज्ञांनी सुरू केली आहे. मात्र कपड्यांमार्फतही कोरोनाव्हायरस पसरतो. व्हायरस असलेल्या कपड्यांना हात लावल्यानंतर असे हात तोंडाला लावले तर कोरोनाव्हायरस शरीरात प्रवेश करण्याचा धोका वाढतो. मात्र या संशोधनानंतर आता कपड्यांपासून होणारा संक्रमणाचा धोका टाळता येईल, अशी आशा आहे.