मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Earthquake : भूकंपाने इराण हादरलं, आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी, अनेक घरांची पडझड

Earthquake : भूकंपाने इराण हादरलं, आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी, अनेक घरांची पडझड

इराण सरकारने सर्व शासकीय, खासगी रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.

इराण सरकारने सर्व शासकीय, खासगी रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.

इराण सरकारने सर्व शासकीय, खासगी रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

तेहरान, 29 जानेवारी : इराणमधील पश्चिम भागात असलेलं खोया शहर भूकंपाने हादरलं आहे. 5.9 तीव्रतेचा भूकंपाच्या धक्क्यामुळे ठिकठिकाणी घरांची पडझड झाली आहे. आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 440 लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

इराणच्या पश्चिम भागातअजरबैजान भागातील खोय शहरात शनिवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. तुर्की-इराण सीमेजवळ पश्चिम अजरबैजान प्रांत (West Azarbaijan Province) च्या खोय शहरात भूकंपाचे धक्के सर्वाधिक जाणवले. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

(चीनचा पाय आणखी खोलात? 80% लोक संक्रमित, दुसऱ्या लाटेबाबत टॉपच्या शास्त्रज्ञांचा मोठा दावा)

इराण सरकारने सर्व शासकीय, खासगी रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. आपात्कालीन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, ज्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहे, त्या भागात बर्फवृष्टी होत आहे. तिथलं तापमान हे उणे शुन्याच्या खाली आहे. अनेक भागात वीजपुरवठा खंडीत झाला आहे. इराणपासून भूगर्भीय फाल्टलाइंस (geological faultlines) जाते. त्यामुळे मागील अनेक वर्षांमध्ये अशा भागात विनाशकारी भूकंप आले आहे.

(अमेरिकेमध्ये 'मास ले-ऑफ', हजारो भारतीयांचा नवी नोकरी शोधण्यासाठी संघर्ष!)

विशेष म्हणजे, मागील वर्षी 2 जुलैला इराणमध्ये भूकंप आला होता. या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. इराणच्या आजूबाजूच्या देशांनाही याचे हादरे बसले होते. कतार आणि चीनला सुद्धा याचे हादरे जाणवले होते.

या भूकंपाची तीव्रताही 6.0 इतकी होती. या भूकंपामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता तर 44 लोक जखमी झाले होते. इराणचे होर्मोजगनपासून बंदरगाह शहर बंदर अब्बासच्या दक्षिण-पश्चिम भागात 100 किमी दूर अंतरावर भूकंपाचे केंद्रबिंदू होते.

First published:

Tags: Iran, भूकंप