जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / 5G मोबाईलमुळे दुबईचा पेच, अमेरिकेतील काही शहरांत जाणारी विमानसेवा स्थगित

5G मोबाईलमुळे दुबईचा पेच, अमेरिकेतील काही शहरांत जाणारी विमानसेवा स्थगित

5G मोबाईलमुळे दुबईचा पेच, अमेरिकेतील काही शहरांत जाणारी विमानसेवा स्थगित

अमेरिकेतील काही विमानतळांनी आपली यंत्रणा 5G मोबाईल यंत्रणेचा वापर करत अद्ययावत केली आहे. मात्र यामुळे या विमानतळावर लँडिंग करताना विमानांना अडथळे येत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

दुबई, 19 जानेवारी: दुबईच्या (Dubai) एमिरेट्स एअरलाईन्सनं (Emirates Airlines) अमेरिेकेतील (America) काही शहरांतील विमानसेवा (Air service) सध्या खंडित (Suspended) करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील काही विमानतळांवर 5G मोबाईल यंत्रणा (5G mobile technology) बसवण्यात आली आहे. या यंत्रणेतील अपडेट्स अद्याप इतर अनेक देशांच्या विमान यंत्रणांमध्ये अपडेट करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे विमानतळावर लँडिंग करण्यास अडथळे येत असल्याचं दिसून आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.   या विमानतळांवर 5G मोबाईल अमेरिकेतील बॉस्टन, शिकागो, डल्लास फोर्ट वर्थ, ह्युस्टन, मियामी, नेवार्क, ओरलांडो, सॅन फ्रॅन्सिस्को आणि सिएटन या विमानतळांवर फाईव्ह जी तंत्रज्ञान बसवण्यात आलं आहे. तर न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि वॉशिंग्टन विमानतळावर मात्र अद्याप पूर्वीचीच यंत्रणा कार्यान्वित आहे. त्यामुळे केवळ याच ठिकाणी विमानं उतरतवली जात आहेत. या विमानतळांपुरती विमानसेवा दुबईनं सुरू ठेवली असून इतर ठिकाणची सेवा मात्र बंद करण्यात आली आहे.   तंत्रज्ञ लागले कामाला नजीकच्या भविष्यकाळात संपूर्ण जगभरात 5G मोबाईल तंत्रज्ञान येणार असून त्या दृष्टीनं आपापल्या विमानांमधील यंत्रणा अद्ययावत करून घेण्याच्या सूचना विमान कंपन्यांना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ गृहित धरून टप्प्याटप्प्यानेच विमानतळांवर 5G यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. विमान कंपन्यांनी लवकरात लवकर आपल्या यंत्रणेत सुधारणा केल्या नाहीत, तर तितका काळ त्यांना सेवा ठप्प ठेवावी लागणार आहे.   हे वाचा -

सुरक्षेसाठी 5G आधुनिक तंत्रज्ञानाचा मुद्दा आणि प्रगत होत जाणारी टेक्नॉलॉजी यामुळे 5G यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहेच, मात्र याचा मुख्य उद्देश हवाई सुरक्षा हा आहे. नव्या यंत्रणेद्वारे हवाई सुरक्षा अधिक चोख आणि सतर्क होत असल्याचं सिद्ध झालं आहे. हवाई क्षेत्रात येणाऱ्या कुठल्याही अनोखळी ऑब्जेक्टला ओळखून त्याला रोखण्याची सोय नव्या तंत्रज्ञानात आहे. मात्र जोपर्यंत विमानात ही यंत्रणा कार्यान्वित केली जात नाही, तोपर्यंत विमानतळावरील यंत्रणेच्या दृष्टीनं विमानं हीदेखील अनोळखी वस्तू ठरतात. त्यामुळे विमानांच्या लँडिंगला अडथळे येतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात