मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

'दररोज एक ग्लास जास्त दूध प्या', पंतप्रधानांचं नागरिकांना आवाहन; काय आहे कारण पाहा

'दररोज एक ग्लास जास्त दूध प्या', पंतप्रधानांचं नागरिकांना आवाहन; काय आहे कारण पाहा

थंड आणि गरम दूध कोणत्याही प्रकारे पिणे फायदेशीर आहे. पण आपण ऋतूनुसार दूध प्यायले तर ते तुमच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

थंड आणि गरम दूध कोणत्याही प्रकारे पिणे फायदेशीर आहे. पण आपण ऋतूनुसार दूध प्यायले तर ते तुमच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

देशातील सेलिब्रिटी, मंत्रीही दूध पिण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. सोशल मीडियावरही मोहीम चालवली जात आहे.

  • Published by:  Priya Lad

टोकियो, 23 डिसेंबर : दुधाला (Milk) पूर्णान्न म्हटलं जातं. दूध पिण्याचे किती फायदे आहेत हे आपल्याला माहितीच आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या दिवसाची सुरुवात दूध पिऊनच होते. आता हेच दूध दररोज एक ग्लास जास्त पिण्याचा सल्ला दिला आहे तो खुद्द पंतप्रधानांनी. पंतप्रधानांनी नागरिकांना तसं आवाहन केलं आहे. नेमकं यामागे कारण काय आहे?

दररोज एक ग्लास जास्त दूध पिण्याचं आवाहन केलं आहे ते जपानचे (Japan)  पंतप्रधान फुमियो किशिदा (Prime Minister Fumio Kishida) यांनी.  मंगळवारी संसदीय सत्राच्या अखेर आयोजित एका संमेलनात बोलताना पीएम किशिदा म्हणाले, लोकांनी सामान्यपणे एक अतिरिक्त कप दूध पिण्यात योगदान द्यावं. जेवण बनवताना जास्तीत जास्त दुग्धजन्य पदार्थांचा वापर करावा.

झी न्यूज हिंदीने WION रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार  नुकत्याच एका कंपनीने एक कार्यक्रम आयोजित केला होता ज्यात सेलिब्रिटीज लोकांना दूध पिण्यासाठी प्रोत्साहित करत होते. काही मंत्रीही पत्रकार परिषदेत दूध पिताना दिसले. 17 डिसेंबरला जपानचे कृषीमंत्री जेनजिरो कानेको (Genjiro Kaneko)  आणि टोकियोचे राज्यपाल युरिको कोइके (Tokyo Governor Yuriko Koike)  यांनी आपल्या पत्रकार परिषदेत दूध पिऊन लोकांना प्रोत्साहित करण्याता प्रयत्न केला होता आणि आता देशाचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनीही जपानच्या जनतेला अतिरिक्त दूध पिण्याचं आवाहन केलं आहे.

हे वाचा - शाकाहार करणाऱ्यांनो तुमच्या आहारात 'या' गोष्टी आहेत का? नसेल तर लगेच करा समावेश

टेक्नॉलॉजीबाबत चर्चेत असलेलं जपान सध्या दुधामुळे चर्चेत आलं आहे. संपूर्ण देशात दूध पिण्यावर इतका भर का दिला जात आहे. तर याचं कारण आहे मोठ्या प्रमाणात होणारी दुधाची नासाडी रोखणं.

जपानमध्ये यावर्षी दुधाची मागणी घटली आहे. इथं शाळेत मुलांना दूध दिलं जातं. पण कोरोना महासाथीमुळे शाळा बंद आहेत. तसंच एनी सेक्टर्समध्येही दुधाची मागणी कमी झाली आहे.  परिणामा दुधाचा खप कमी झाला. ज्यामुळे दूध वाया जात आहे. एका रिपोर्टमध्ये सरकारी आकड्यांचा हवाला देत सांगण्यात आलं आहे की थंडीत जवळपास 5000 टन दूध वाया जाण्याची शक्यता आहे.

हे वाचा - अमिताभ बच्चन यांनी आवडीने खाल्ला नागिन सॉस; काय असतं त्यात, त्याची किंमत काय?

ही नासाडी होऊ नये यासाठी जपानमधील शेतकरी एकवटले आहेत.  25 डिसेंबर ते  3 जानेवारीपर्यंत त्यांनी एक लीटर दूध खरेदीचा संकल्प केला आहे.  #1Lperday हॅशटॅगसह ही मोहीम सोशल मीडियावरही सुरू आहे आणि लोकांचं लक्ष वेधलं जात आहे. या मोहिनेत बड्या कंपन्यांही सहभागी झाल्या आहेत. लॉसन इंकने आपल्या स्टोर्सवर एक कप हॉट मिल्कवर 50 टक्के सूट दिली आहे.

First published:

Tags: Food, Japan, Lifestyle, World news