मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Diet For Vegetarians: शाकाहार करणाऱ्यांनो तुमच्या आहारात 'या' गोष्टी आहेत का? नसेल तर लगेच करा समावेश

Diet For Vegetarians: शाकाहार करणाऱ्यांनो तुमच्या आहारात 'या' गोष्टी आहेत का? नसेल तर लगेच करा समावेश

शाकाहार (Vegetarian) हा उत्तम आहार समजला जातो. मात्र, त्यात सर्व गोष्टींचा समावेश केला तर. तुम्हीही शाकाहारी असाल तर तुमच्या आहारात यो गोष्टींचा समावेश आहे का? हे नक्की तपासून पहा. नसेल तर आजच याचा समावेश करायला सुरुवात करा.

मुंबई, 23 डिसेंबर : मांसाहार (Non Vegetarian) करणाऱ्या लोकांना जास्त पोषण मूल्य (Nutrients) मिळतात आणि शाकाहारी लोकांना पोषक तत्वं कमी मिळतात, असा गैरसमज आपल्याला नेहमी दिसतो. मात्र हे खरं नाही. शाकाहारी लोकांनाही (Vegetarian) सर्व पोषण मूल्य मिळू शकतात तेही अगदी वाजवी किंमतीत. फक्त शाकाहारी लोकांनी या काही पदार्थांचा आपल्या आहारात आवर्जून समावेश केला पाहिजे. सर्वच प्रकारच्या डाळी (Pulses) आरोग्यासाठी खूपच चांगल्या असतात. या डाळींचे नियमित सेवन केल्याने तुमच्या शरीराला जास्त पोषणमूल्य नक्की मिळतील.

साधारणपणे शाकाहारी लोक आपल्या रोजच्या जेवणात किमान एकदा तरी कोणत्यातरी रुपानं डाळींचं सेवन करतात. मग ते कधी डाळ भात, खिचडी किंवा अगदी दाल मखनीच्या रुपात असो. डाळी या शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा मुख्य स्रोत (Source of protein) आहेत. तसंच राजमा, हरभरे यासारख्या कडधान्यांतही फायबर, कॅल्शियम आणि अन्य पोषण मूल्य भरपूर प्रमाणात असतात.

तूरडाळ आवर्जून खा

तूरडाळ आरोग्यासाठी खूप चांगली असते. तूर डाळीत प्रोटिन म्हणजेच प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. यामधून 20 ते 25 टक्के प्रोटिन (Protein) मिळू शकतं. तसंच हेल्दी कार्बोहायड्रेट आणि आयर्न म्हणजेच लोहही भरपूर प्रमाणात असतं. हाय ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी तूरडाळ मदत करते. त्याचबरोबर ह्रदयविकार असणाऱ्यांसाठीही तूर डाळ अत्यंत फायदेशीर आहे.

हरभऱ्यांचा जेवणात समावेश करा

हरभरे म्हणजेच चणे प्रोटीनचा उत्तम स्रोत आहेत. त्याचबरोबर हायपरटेन्शनची समस्या कमी करण्यातही हरभरे उपयुक्त असतात. हरभरा डाळीत प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. त्याचबरोबर हरभऱ्यांमध्ये कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियमही भरपूर असतं. हरभरा डाळ खाल्यानं हृदयाचं कार्य व्यवस्थित होतं. त्याचबरोबर रक्तवाढीसाठीही हरभरे खाणं चांगलं असतं. डायबेटिस म्हणजेच शुगरच्या रुग्णांनाही यामुळे फायदा होतो. बेसन लाडू, डाळमूठ, पराठे किंवा अगदी पुरणपोळीच्या स्वरुपातही तुम्ही हरभरा डाळ खाऊ शकता.

कोरोनाच्या दहशतीत टेन्शन फ्री होऊन सणांचा आनंद कसा लुटावा?; तज्ज्ञांच्या टीप्स

उडदाची डाळ खा

तुमच्या डाएटमध्ये उडदाची डाळ नक्की खा. यामध्ये प्रोटीनबरोबरच आयर्नही भरपूर प्रमाणात असतं. उडदाची डाळ खाल्ल्यानं शरीराला एनर्जी मिळते. त्याचबरोबर त्यामधून मिळणाऱ्या प्रोटीन्समुळे स्नायूंचीही वाढ होते. स्नायू बळकट होतात. त्याचबरोबर उडदाची डाळ खाल्ल्यानं हाडंही मजबूत होतात आणि हृदयही व्यवस्थित राहतं.

मसूर डाळ

शाकाहारी लोकांच्या शरीरातील पोषणमूल्यांची कमतरता पूर्ण करण्यासाठी मसूराची डाळ अगदी उपयुक्त आहे. सायनस आणि पाठीच्या दुखण्याची समस्या असणाऱ्यांनी मसूर डाळीचं सेवन केलं तर त्यांना खूप फायदा होतो. या डाळीत प्रोटीनही भरपूर प्रमाणात असतं. त्याचबरोबर या डाळीत फॉलिक ॲसिड आणि मॅग्नेशियमसारखी खनिजही भरपूर असतात.

Neem leaves : त्वचेपासून केसांच्याही आरोग्यासाठी गुणकारी आहेत कडुनिंबाची पाने

डाळी तर आपल्या रोजच्या जेवणाचा भाग आहेत. त्या अगदी सहजपणे घरात उपलब्ध असतात. त्यामुळे अन्य कुठलेही महागडे उपाय आणि औषधं घेण्यापेक्षा शाकाहारी लोकांनी आपल्या जेवणात या डाळींचं प्रमाण वाढवल्यास नक्की फायदा होईल.

First published:

Tags: Health, Health Tips