मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

अमिताभ बच्चन यांनी आवडीने खाल्ला नागिन सॉस; इतकं काय असतं त्यात आणि त्याची किंमत काय?

अमिताभ बच्चन यांनी आवडीने खाल्ला नागिन सॉस; इतकं काय असतं त्यात आणि त्याची किंमत काय?

आपण हा सॉस खाण्याची खूप इच्छा झाली होती, असं अमिताभ बच्चन यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आपण हा सॉस खाण्याची खूप इच्छा झाली होती, असं अमिताभ बच्चन यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आपण हा सॉस खाण्याची खूप इच्छा झाली होती, असं अमिताभ बच्चन यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मुंबई, 23 डिसेंबर : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे नेहमीच त्यांच्या चित्रपटांतील वैविध्यपूर्ण भूमिका तसेच कौन बनेगा करोडपती या शोमधील आकर्षक शैलीतील सूत्रसंचालनमुळे चर्चेत असतात. अमिताभ बच्चन हे चित्रपटसृष्टीत जितके सक्रिय आहेत, तितकेच ते सोशल मीडियावर (Social Media) देखील सक्रिय आहेत. खासगी आयुष्यातील त्यांच्या सोशल मीडियातील पोस्ट नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतात. सध्या अमिताभ बच्चन यांची अशीच एक पोस्ट विशेष चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी डिनर मेन्यू (Dinner Menu) शेअर केला आहे. या मेन्यूत एक सॉसची (Amitabh Bachchan nagin sauce)  बाटली दिसत असून, त्या बाटलीवरील नाव जरा हटके असल्याने फॅन्सची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. याबाबतची माहिती `झी न्यूज हिंदी`ने दिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी नुकतीच सोशल मीडियावर डिनर मेन्यूबाबत जी पोस्ट टाकली आहे, त्यात अन्य पदार्थांसोबत एक सॉसची बाटली दिसत आहे. या बाटलीवर नागिन सॉस (Nagin Sauce) असं लिहीलं आहे. त्यामुळे हा मेन्यू फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. या डिनर मेन्यूचा फोटो अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवरून शेअर केला आहे. यात त्यांनी कॅप्शन मध्ये म्हटलं आहे की "बऱ्याच कालावधीनंतर प्रीमियर लीग फुटबॉल, पास्ता, फ्रेंच फ्राइज, गार्लिक ब्रेड आणि नागिन सॉस. यासाठी मी खूप तळमळत होतो".

यातील चर्चेत असलेला नागिन सॉस हा खूप खास मानला जातो आणि तो खरेदी करणंही खूप सोपं आहे. अॅमेझॉन (Amazon) वेबसाइटवर नागिन सॉसच्या 230 ग्रॅम बाटलीची किंमत सुमारे 250 रुपये नमुद करण्यात आली आहे.

हे वाचा - आपण प्रवास का करावा? हा प्रश्न ज्यांना पडलाय त्यांनी हे चित्रपट Miss करू नये!

हा नागिन सॉस कांथा बॉंब (Kantha Bomb) फ्लेवर आहे. हा सॉस व्हेजिटेरियन उत्पादन आहे. यात कोणत्याही प्रकारचे आर्टिफिशियल कलर्स नसतात. तसंच हा सॉस फार तिखटही नसतो. त्यामुळे कमी तिखट खाणाऱ्या व्यक्ती आहारात या सॉसचा समावेश करू शकतात. हा सॉस देशातील सर्वात चविष्ट अशा केरळच्या कंथारी मुलाकू मिरची पासून तयार केला जातो. मार्केटमध्ये नागिन सॉसचे स्मोकी भूत आणि द ओरिजनल असे अन्य फ्लेवर्सदेखील उपलब्ध आहेत.

हे वाचा - Year Ender 2021 : यावर्षीचे चित्रपट जे बॉक्स ऑफिसवर ठरले फ्लॉप, पाहा लिस्ट

अमिताभ बच्चन यांच्या आगामी प्रोजेक्टसविषयी बोलायचं झालं तर, त्यांनी नुकतेच रनवे 34 या चित्रपटाचं शुटिंग पूर्ण केलं आहे. यात त्यांच्यासोबत अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) भूमिका करत आहे. अजय देवगणने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. तसेच त्यांनी रणबीर कपूरसोबत ब्रह्मास्त्र या चित्रपटात भूमिका साकारली आहे. नुकताच या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं. यात रणबीर कपूर एका वेगळ्याच लूकमध्ये दिसेल.

First published:

Tags: Amitabh Bachchan, Entertainment, Food, Lifestyle