अमेरिकेच्या नाकावर टिच्चून चीनची WHO मोठी मदत, व्हायरसच्या चौकशीची मागणी फेटाळली

अमेरिकेच्या नाकावर टिच्चून चीनची WHO मोठी मदत, व्हायरसच्या चौकशीची मागणी फेटाळली

डोनाल्ड ट्रम्प यांनी WHOची सर्व मदतही बंद केली होती. ही संघटना अमेरिकेकडून मदत घेते आणि चीनला मदत करते असे आरोप त्यांनी केले होते. आता चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी पहिल्यांदाच त्यावर थेट भाष्य करत अमेरिकेला टोला लगावला आहे.

  • Share this:

बीजिंग 18 मे: कोरोनाच्या उद्रेकानंतर अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेवर टीका केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर WHOही चीनच्या तालावर नाचत असल्याची टीका सातत्याने केली होती. त्याच्याच पुढचं पाऊल टाकत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी WHOची सर्व मदतही बंद केली होती. ही संघटना अमेरिकेकडून मदत घेते आणि चीनला मदत करते असे आरोप त्यांनी केले होते. आता चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी पहिल्यांदाच त्यावर थेट भाष्य करत अमेरिकेला टोला लगावला आहे.

WHOच्या वल्ड हेल्थ समिटमध्ये बोलताना त्यांनी अमेरिकेचं नाव न घेता सर्व आरोप फेटाळून लावले आणि WHOला पुढच्या दोन वर्षांसाठी 2 बिलियन डॉलर्सची मदत जाहीर केली. चीनने सर्व जगाला योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पाहिजे ती सर्व माहिती दिली आणि पारदर्शकपणे परिस्थिती हाताळली असं जिनपिंग यांनी सांगितलं. त्यामुळे युरोप आणि अमेरिकेने केलेली चौकशीची मागणी चीनने फेटाळल्याचं बोललं जात आहे.

चीनच्या वुहानमधून कोरोनाचा जगप्रसार झाला. एकीकडे वुहानच्या लॅबमधून कोरोना पसरल्याचा दावा, अमेरिका करत असली तरी त्याबाबत ठोस पुरावे सापडले नाही आहेत. मात्र आता चीननं कोरोनाना रुग्णांची आणि मृतांची माहितीही लपवल्याचा आरोप केला जात आहे. चीनमध्ये 6 लाख 40 हजारहून अधिक कोरोना रुग्ण होते, मात्र चीन सरकारनं केवळ 82 हजार रुग्ण असल्याचे जाहीर केलं आहे. ही धक्कादायक आकडेवारी फॉरेन पॉलिसी मॅगझिन आणि '100 रिपोर्टर' मध्ये प्रसिद्ध केली आहे.

'...तर भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करेल', इम्रान खान यांनी मागितली मदत

चिनी सैन्याच्या National University of Defense Technologyने कोरोना संदर्भातील एक डेटा तयार केला होता. आता हा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. यात देशभरातील पसरलेल्या हॉस्पिटलची ठिकाणे, अपार्टमेंट कंपाऊंड, हॉटेल, सुपरमार्केट, रेल्वेस्टेशन्स, रेस्टॉरंट्स आणि शाळा संबंधित ठिकाणांची नावं एकत्र करण्यात आली आहेत.

जगातल्या या देशांमध्ये कोरोनाचा दुसरा उद्रेक होणार, शास्त्रज्ञांचा इशारा

'100 रिपोर्टर' या मासिकेनं अशी माहिती दिली आहे की, "हा डेटा व्यापक स्वरुपाचा नसला तरी, यातील आकडेवारी आश्चर्यकारक आहे. याच 6 लाख 40 हजारहून अधिक अपडेट आहेत, यात किमान 200 शहरांची माहिती आहे. म्हणजेच या आकडेवारीवरून 6 लाख 40 हजार प्रकरणं नोंदवली गेली आहेत". बीजिंगने कोरोना व्हायरस डेटा किती आणि किती लोकसंख्येवर जमा केला याचा उल्लेखही यात केला आहे. या डेटाच्या लीकमुळे चीनचा खोटेपणा जगासमोर आला आहे.

 

First published: May 18, 2020, 6:37 PM IST
Tags: chinawho

ताज्या बातम्या