नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण 2024 ची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर काही दिवसांमध्येच ट्विटरचे नवे मालक एलोन मस्क यांनी एक सर्वेक्षण केले. ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा ट्विटरवर अकाऊंट ओपन करण्याची परवानगी देण्यात यावी की नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. एलॉन मस्क यांनी एक ट्विट करत आपल्या 11.6 कोटी फॉलोअर्सला हा प्रश्न विचारला. त्यानंतर त्यांनी आणखी एक लॅटीन भाषेत ट्विट केलं. ज्याचा अर्थ लोकांचा आवाज हाच इश्वराचा आवाज असा होतो असे ते म्हणाले होते.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 22 महिन्यांनंतर ट्विटरवर परतले आहेत. कंपनीने त्याचे ट्विटर अकॉउंट पुन्हा सक्रिय करण्यात आले आहे. एलॉन मस्क यांनी यासाठी ट्विटर सर्वे करत हा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये 15 दशलक्ष मतदारांनी ट्रम्प यांचे अकॉउंट पुन्हा सक्रिय करण्यास समर्थन दिले होते, ज्याच्या आधारावर कंपनीच्या नवीन मालक एलॉन मस्क यानी हा निर्णय घेतला.
हे ही वाचा : ट्रम्प यांना पुन्हा ट्विटरवर एन्ट्री द्यावी का? मस्क यांचा थेट सर्व्हे; पहा काय म्हणाले?
याबाबत ट्विट करत ते म्हणाले की, बहुसंख्य लोकांना ट्रम्प अकॉउंट पुन्हा सुरू व्हावी अशी इच्छा आहे. जानेवारी 2021 मध्ये डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत पराभुत झाल्यनंतर त्यांच्या समर्थकांनी यूएस कॅपिटलवर हल्ला केला होता. अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी एका ट्विटमध्ये हिंसाचार करणाऱ्या आपल्या समर्थकांचे क्रांतिकारक असे वर्णन केले होते. यावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.
यानंतर, डोनाल्ड ट्रम्प यांनी एका ट्विटमध्ये म्हणाले होते, 20 जानेवारी 2021 रोजी होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या शपथविधीला जाणार नाहीत. यानंतर ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून जमाव भडकावल्याबद्दल दोषी मानले आणि त्यांच्या अकॉउंटवर बंदी घातली.
आधी ही बंदी फक्त 12 तासांसाठी होती, नंतर ट्विटरने ती अनिश्चित काळासाठी वाढवली. निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून जो बायडेन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले. ट्विटरचे नवीन बॉस एलॉन मस्क यांनी आपल्या ट्विटर पोलमध्ये लोकांना विचारले की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते पुन्हा सुरू केले जावे का. या मतदानाबाबत अनेक वापरकर्ते मस्कवर नाराज झाले, परंतु ट्रम्प यांच्या पुनरागमनाच्या बाजूने अधिक मते पडली.
हे ही वाचा : रशियाने केली हद्दपार, अमेरिका संतापली, जो बिडेन यांनी बोलावली बैठक
मस्क सातत्याने चर्चेत
ट्विटर विकत घेतल्यानंतर एलॉन मस्क यांनी घेतलेल्या काही निर्णयावर जगभरातून टीका झाली. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली कर्मचाऱ्यांची कपात. तसेच पेड ब्लू टीक बाबतच्या निर्णयाचा समावेश आहे. ट्विटर विकत घेतल्यापासून एलोन मस्क याना त्या कारणाने सातत्याने चर्चेत आहेत. ते आता पुन्हा या सर्वेक्षणामुळे चर्चेत आले आहेत.