मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Poland Misile Attack : रशियाने केली हद्दपार, अमेरिका संतापली, जो बिडेन यांनी बोलावली बैठक

Poland Misile Attack : रशियाने केली हद्दपार, अमेरिका संतापली, जो बिडेन यांनी बोलावली बैठक

नाटो सदस्य असलेल्या पोलंडच्या सीमेजवळील ल्विव्हसह संपूर्ण युक्रेनवर रशियन क्षेपणास्त्रांनी मारा केल्याचा दावा करण्यात आला आहे.

नाटो सदस्य असलेल्या पोलंडच्या सीमेजवळील ल्विव्हसह संपूर्ण युक्रेनवर रशियन क्षेपणास्त्रांनी मारा केल्याचा दावा करण्यात आला आहे.

नाटो सदस्य असलेल्या पोलंडच्या सीमेजवळील ल्विव्हसह संपूर्ण युक्रेनवर रशियन क्षेपणास्त्रांनी मारा केल्याचा दावा करण्यात आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : मागच्या कित्येक महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या दरम्यान रशिया आणि अमेरिकेतही खटके उडाल्याने रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी जागतीक युद्धाला तयार रहा असा इशारा दिला होता. या दरम्यान नाटो सदस्य असलेल्या पोलंडच्या सीमेजवळील ल्विव्हसह संपूर्ण युक्रेनवर रशियन क्षेपणास्त्रांनी मारा केला. दरम्यान, रशियाचे क्षेपणास्त्र आपल्या हद्दीत पडल्याने दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा पोलंडने केला आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे.

रशियन बनावटीच्या क्षेपणास्त्र मंगळवारी पोलंडच्या हद्दीत पडले. यामुळे प्रझेवोडो गावातील दोन लोकांचा मृत्यू झाला. पोलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लुकाझ जसिना यांनी याबाबत निवेदन काढत माहिती दिली.

हे ही वाचा : दोन विमानांची धडक अन् हवेतच आगीचा भडका; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा LIVE VIDEO

या प्रकरणावर, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने रशियन क्षेपणास्त्र पोलंडमध्ये पडले नसल्याचे सांगत पोलंडच्या वृत्ताचे खंडन केले. रशियाने हा मुद्दाम केलेलं कारस्थान असल्याचे बोलले जात आहे. परंतु रशियाच्या संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले की, रशिया आणि पोलंड सीमेवर असल्या कोणत्याही प्रकारचे कृत्य आम्ही केलं नसल्याचे ते म्हणाले.

यावर अमेरिकेच्या व्व्हाईट हाऊसने सांगितले की, पोलंडने दिलेल्या माहितीवर आम्ही अद्याप विश्वास ठेवू शकत नाही. यावर सविस्तर माहिती घेऊन आम्ही बोलणार असल्याचे ते म्हणाले. नाटो सदस्य नॉर्वे, लिथुआनिया आणि एस्टोनियामधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला अद्यापही पूर्ण माहिती मिळाली नाही. माहिती घेऊन आम्ही यावर भाष्य करणार असल्याचे त्या देशांना सांगितलं नॉर्वेजियन न्यूज एजन्सी एनटीबीच्या म्हणण्यानुसार नॉर्वेचे परराष्ट्र मंत्री अनिकेन हुटेफेल्ट म्हणाले, ही एक अतिशय गंभीर घटना आहे, परंतु अद्याप बऱ्याच गोष्टी आहेत त्या गुलदस्त्यात आहेत.

राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीनंतर पोलंडने आपल्या सैन्याला हाय अलर्ट दिला आहे. पोलंड परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते पिओटर मुलर यांनी पत्रकारांना सांगितले की, लष्कराला आम्ही तयारीत राहण्याचा आदेश दिला आहे. केव्हाही आप्तकालीन परिस्थीती ओढवू शकते असे सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा : रशिया-युक्रेन युद्धात सैनिकाच्या छातीत घुसला बॉम्ब; पुढं जे घडलं ते चकित करणारं

यावर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, पोलंडच्या वरिष्ठ पातळीवर आमचे बोलणे झाले आहे. पोलंडला लागेल ती मदत आम्ही देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितलं. पोलंड नाटोचा सदस्य आहे. त्यावर हल्ला हा नाटोवरील हल्ला असल्याचे बायडेन म्हणाले. परंतु हा एक अपघात आहे की, कोणी मुद्दाम केलं आहे यावर अद्याप माहिती समोर आली नसल्याने कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

पोलंडमधील स्फोटाबाबत बायडेन यांनी नाटो प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांच्याशी चर्चा करत तातडीची बैठक बोलवली आहे. या घटनेचा जगभरात निषेध करण्यात आला. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, यापूर्वी रशियाने दोन रशियन क्षेपणास्त्रांनी पोलंडवर हल्ला केला होता. आणि आताही एक अतिशय चिथावणीखोर कृत्य केल्याचे झेलेन्सकी म्हणाले.

First published:

Tags: Russia, Russia Ukraine, Russia's Putin