Home /News /videsh /

US राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील अपयशानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मिळाली चक्क जॉबची ऑफर

US राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील अपयशानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मिळाली चक्क जॉबची ऑफर

कोणी पाठवली ट्रम्प यांना जॉबची ऑफर?

    वॉशिंग्टन, 9 नोव्हेंबर : व्हाइट हाउस (White House) च्या स्पर्धेत डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) अपयशी झाल्यानंतर येरूसलेममधील नगर निगमने (municipal corporation in Jerusalem) त्यांना नोकरीची ऑफर देऊ केली आहे. त्यांनी ट्रम्प यांना संदेश दिला आहे की, अपयश आलं तरी तुम्ही काळजी करू नका. कारण येथे त्यांच्यासाठी अशा अनेक रिक्त जागा आहेत ज्यामध्ये तुमची अर्ज करण्याची योग्यता आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार नगर निकायच्या फेसबुक पेजवर जॉब बोर्डची लिंक शेअर करण्यात आली आहे आणि लिहिलं आहे की, 'डोनाल्ड जे. ट्रम्प तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आमच्या नवीन येरूसलेम जॉब बोर्ड नवीन नोकरीच्या संधींसह अपडेट करण्यात आल्या आहे. वृत्तपत्र येरूसलेम पोस्टच्या बातमीनुसार ही पोस्ट नगर निकायच्या फेसबुक पेजवरुन तातडीने हटविण्यात आली आहे. निकायच्या एका प्रवक्त्यांनी सांगितले की, सावधानता न बाळगल्याने शेअर झाली आहे. मात्र कळताच ही पोस्ट तातडीने हटविण्यात आली आहे. ट्रम्प प्रशासन साधारण 7 दशकांपासून सुरू असलेल्या अमेरिकेच्या परराष्ट्र नीतीमध्ये बदल करीत डिसेंबर 2017 मध्ये येरूसलेमला इज्राईलची राजधानीच्या रुपात मान्यता दिली होती. हे ही वाचा-वीज नाही, पोटभर अन्न नाही; 5 वर्षांपर्यंत मुलाने वृद्ध आई-बापाला केलं कैद बायडेन यांना शुभेच्छा दिल्या नाहीत अनेक देशांच्या नेत्यांनी बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या विजयानंतर शुभेच्छा दिल्या आहे. तर एक नेता मात्र शुभेच्छा देताना सावधानता बाळगत आहे. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एंड्रेस मेनवेल लोपेस लोपेस ओब्रेडोर ज्यांना एमलो या नावानेही ओळखले जाते. त्यांचं म्हणणं आहे की, 'आता शुभेच्छा देणं घाई ठरेल. म्हणून कायदेशीर बाबी पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करू इच्छितो. त्यांचा इशारा ट्रम्प यांच्या निवडणुकीत झालेल्या गोंधळाच्या आरोपाबाबत होता, याबाबत ट्रम्प न्यायालयात आव्हान देणार आहेत. मात्र अद्याप या दाव्यांबाबत ट्रम्प यांनी कोणतेही पुरावे सादर केले नाही. शनिवारी एमलो यांनी मीडियाला सांगितलं की, मी निष्काळजीपणा करू इच्छित नाही. आम्हाला विचार न करता काहीही करायचं नाही. आम्ही लोकांचा निर्णय आणि त्यांच्या हक्काचा सन्मान करतो.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Donald Trump, US elections

    पुढील बातम्या