वीज नाही, पोटभर अन्न नाही; 5 वर्षांपर्यंत मुलाने वृद्ध आई-बापाला केलं कैद, मुलगी आल्यानंतर झाला खुलासा

वीज नाही, पोटभर अन्न नाही; 5 वर्षांपर्यंत मुलाने वृद्ध आई-बापाला केलं कैद, मुलगी आल्यानंतर झाला खुलासा

बंद खोलीतच बापाला पॅरालिसीसचा अटॅक आला, तर आई आता शेवटच्या घटका मोजत आहे

  • Share this:

झारखंड, 8 नोव्हेंबर : झारखंडमधील जिल्हा बोकारोमध्ये एका मुलाने आपल्या वृद्ध आई-वडिलांसोबत जे केलं ते अत्यंत धक्कादायक आहे. ज्या मुलाच्या आंतरजातील विवाहासाठी आई-वडिलांनी समर्थन दिलं. त्यांनाच पंचायतीच्या सांगण्यानुसार पाच वर्षे एका खोलीत बंद ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इतकच नाही तर या वृद्ध आई-वडिलांना पोटभर जेवणही दिलं जात नव्हतं. पाच वर्षे एका खोलीत राहणाऱ्या वडिलांना पॅरालिसीस झाला. तर आई शेवटच्या घटका मोजत आहे. यादरम्यान मुलीने पोलिसांच्या मदतीने आई-वडिलांची सुटका केली. बालीडीह ठाणे हद्दीतील निवासी शंभू महतो बोकारो स्टील प्लांटमधून निवृत्त कर्मचारी आहेत. शंभू महतो यांना चार मुलं आणि 1 मुलगी आहे. 2014 मध्ये शंभू महतोंचा छोटा मुलगा अनु कुमारने आंतरजातीय विवाह केला. या विवाहाला त्यांच्या समाजातील लोकांचा विरोध होता. यादरम्यान पंचायत बोलावण्यात आली. ज्यामध्ये पंचायतीचा प्रमुख हरीश महतो यांच्यासह गावातील अनेकजण सहभागी झाले.

या पंचायतीत फर्मान जारी केलं की आंतरजातील विवाह करणाऱ्या अनु कुमारच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घातला जातो. सोबत या कुटुंबासोबत संबंध ठेवणाऱ्या कुटुंबाचाही बहिष्कार करण्यात येईल, असे सांगण्यात आले. पंचायतीच्या या फर्मानानंतर वृद्ध दाम्पत्याची तीन मुलं सामाजिक बहिष्काराच्या भीतीने त्यांच्यापासून दूर गेले. तर वृद्ध दाम्पत्याने आपला लहान मुलगा अनु कुमार याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा-'भारतालाही एका जो बायडेन यांची गरज; आशा आहे 2024 च्या निवडणुकीत तरी...'

पहिले काही दिवस अनु आई-वडिलांची नीट काळजी घेत होता. मात्र पंचायतीच्या दबावानंतर त्याने आपल्या आई-वडिलांना एका खोलीत बंद केलं. या खोलीत विजेचं कनेक्शनही नव्हतं. त्यांना पोटभर जेवायलाही दिलं जात नव्हतं. यादरम्यान वृद्ध शंभू महतो यांना पॅरालिसीसचा अटॅक आला. तर आईची तब्येत बिघडली आहे. वृद्ध दाम्पत्याच्या मुलीला जेव्हा आईची आठवण आली तेव्हा ती त्यांना भेटण्यासाठी घरी पोहोचली. येथे आई-वडिलांची अशी अवस्था पाहिल्यानंतर तिने पोलिसांची मदत मागितली. येथील पोलीस विनोद कुमार यांना याबाबत माहिती सांगितली. दाम्पत्याची मुलगी बीना कुमारीने आई-वडिलांची सुटका केली,

या प्रकरणात वृद्ध दाम्पत्याचा मुलगा अनुने सांगितले की, तो आपल्या आई-वडिलांची काळजी घेत होता. मात्र लॉकडाऊनमध्ये परिस्थिती बिघडल्यामुळे तो चिंतेत होता. तर मुखीया हरीश महतो यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांना दिलेल्या शिक्षेचा आणि पंचायतीचा संबंध नव्हता. तर आंतरजातील विवाहाचा विरोध समाजातून केला जात असल्याचे महतो यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात त्यांच्या लहान मुलाने पोलिसात तक्रार करायला हवी होती, आई-वडिलांना घरात कोंडून ठेवणे चुकीचे आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: November 8, 2020, 8:56 PM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या