Home /News /videsh /

आता कुत्रा करणार डॉक्टरचं काम, तासाभरात शोधणार 20 कोरोनाबाधित रुग्ण

आता कुत्रा करणार डॉक्टरचं काम, तासाभरात शोधणार 20 कोरोनाबाधित रुग्ण

कॅन्सर, मलेरिया, पार्किन्सन असा आजार असलेल्या माणसांना ओळखण्याचं काम कुत्र्यांच्या माध्यमातून करता येतं. जगात अनेक देशांमध्ये ते केलंही जातं.

    लंडन 16 मे: कोरोना व्हायरसमुळे सगळं जग त्रस्त आहे. २ लाखांच्या वर माणसांचा मृत्यू झालाय. तर प्रचंड संख्येने माणसं कोरोनाने ग्रस्त झाली आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढेच ज्यांना कोरोना झाला आहे किंवा नाही अशा माणसांची ओळख पटवणंही करजेचं आहे. त्यासाठी विशिष्ट प्रकारची टेस्ट करावी लागते. त्याला वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. या कामी आता ब्रिटनमध्ये कुत्र्यांची मदत घेता येते का याचा अभ्सास करण्यात येत आहे. त्यात यश मिळालं तर कोरोना रुग्णांचा छडा लावण्यात मदत होणार आहे. कॅन्सर, मलेरिया, पार्किन्सन असा आजार असलेल्या माणसांना ओळखण्याचं काम कुत्र्यांच्या माध्यमातून करता येतं. जगात अनेक देशांमध्ये ते केलंही जातं. आता अशा काही जातीवंत कुत्र्यांना घेऊन कोरोनाबाधित रुग्णांचा छडा लावता येईल का या वर संशोधन सुरू आहे. BBCने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. London School of Hygiene & Tropical Medicine ही संस्था Durham Universityच्या मदतीने हा प्रकल्प राबवत आहे. ब्रिटन सरकारने त्याला मान्यता दिली असून ५ कोटींचा निधीही त्यासाठी देण्यात आला आहे. कुत्र्यांजवळ गंध ओळखण्याची आणि घेण्याची खास क्षमता असते. सुरक्षेसाठीही त्याचा वापर केला जातो. सोशल डिस्टन्सिंग ठेवाल तरच दिसेल 'ही' जाहिरात, कशी? VIDEO पाहा त्याचबरोबर चोरांचा माग काढणं, भूसुरूंग ओळखणं, स्फोटकांचा छडा लावणं अशा कामांमध्येही त्यांची मदत होते. पोलीस आणि लष्करामध्ये तर कुत्र्यांचा खास विभागही असतो. याच कौशल्याचा वापर कोरोनासाठी करता येईल का याची चाचपणी करण्यात येत आहे. कोरोना रुग्णांचा गंध या कुत्र्यांना देण्यात येणार आहे. त्याच्या वासातून त्यांना अशा माणसांना ओळखणं शक्य होणार आहे. तासाभरात ही कुत्री २० माणसांचा ओळखू शकतील. म्हणजेच लॅबमधल्या टेस्टपेक्षाही कमी वेळात अशा माणसांचा छडा लावण्यात येणार आहे. कोरोनाविरुद्ध माकडांवर केलेल्या चाचणीत ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीला यश या कुत्र्यांच्या ट्रेनिंग नंतर काही माणसांवर त्याची चाचणी होणार असून त्यानंतर गर्दीच्या ठिकाणी किंवा हॉस्पिटलमध्ये अशा डॉक्टर कुत्र्यांना तैनात करण्यात येणार आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या