या जाहिरातीचा फोटो ट्विट करण्यात आला आहे, ज्यामध्ये जाहिरात जवळून पाहिला असता कशी दिसते, त्याचा फोटो डाव्या बाजूला आहे, 6 फुटांवरून कशी दिसते, याचा फोटा उजव्या बाजूला आहे. हे वाचा - आता कोरोनाच्या कम्युनिटी ट्रान्समिशनसाठी तयार राहा; आरोग्य तज्ज्ञांनी केलं सावध हे वृत्तपत्रं प्रकाशित करणाऱ्या या संस्थेनं अशा तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, ज्यामुळे कोणतीही जाहिरात जवळून वाचता येणार नाही. फक्त 6 फूट लांबूनच या जाहिरातीतील शब्द स्पष्ट दिसतात. डिजिटल जाहिरात एजन्सी 'द स्टेबल'ने सांगितल्यानुसार फिनलँडचं हे वृत्तपत्रं सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व समजवण्यासाठी प्रकाशित करण्यात आलं आहे. यामध्ये लोकांना एकमेकांपासून विशिष्ट अंतरावर दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या वृत्तपत्राची चर्चा सध्या सर्वत्र होते आहे. सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन करणाऱ्या टॉयलेट साफ करण्याची शिक्षा अनेक लोकं सोशल डिस्टन्सिंगचं वारंवार उल्लंघन करत आहेत. त्यामुळे अशा लोकांना आता टॉयलेट साफ करायची शिक्षा दिली जाणार आहे. इंडोनेशियामध्ये (Indonesia) अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, इंडोनेशियातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सोशल डिस्टन्सिंगच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास शिक्षा म्हणून टॉयलेट साफ करावे लागती. सुधारणा व्हावी यासाठी देण्यात आलेल्या शिक्षेपैकी एक शिक्षा आहे. कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखणं हा या शिक्षेमागील उद्देश आहे. अशाच पद्धतीनं मास्क न लावणाऱ्यांना 17 डॉलर्स दंड भरावा लागेल, असंही त्यांनी सांगितलं. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा - सावधान! मोबाइल फोनमुळे पसरू शकतो कोरोना, डॉक्टरांनी दिला 'हा' इशाराA Finnish newspaper ran a print ad that can only be read from six feet away. https://t.co/xO4KqVJmar pic.twitter.com/WkEQCbkawP
— Nieman Lab (@NiemanLab) May 11, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus