भोपाळ, 23 एप्रिल : देशभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. एकीकडे कोरोनाग्रस्तांची संख्या 21 हजार पार गेली आहे. आतापर्यंत 681 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4257 रुग्णांना कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना भोपाळमधून एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. एकाचवेळी 44 जणांनी कोरोना व्हायरसवर यशस्वीपणे मात दिली आहे. या सर्वांवरील उपचार यशस्वी झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. चिरायु रुग्णालयात या 44 जणांवर उपचार सुरू होते.
आतापर्यंत 78 जणांनी कोरोनावर यशस्वी मात दिली आहे. ज्यामध्ये पोलिसांचाही समावेश आहे. या कोरोना फायटर्सचं फुलांचा हार गळ्यात घालून टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक करण्यात आलं आहे. या सर्व 44 जणांना होम क्वारंटाइम राहण्याच्या सूचना रुग्णालयाकडून देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी पोलीस सहकारी बर झाल्याच्या आनंदात राष्ट्रगीत आणि हम होंगे कामयाब गाण बॅण्डवर वाजवून स्वागत केलं आहे. यापूर्वी या रुग्णालयातून दोन आयएएस अधिकाऱ्यांसह 30 जण शुक्रवारी आपल्या घरी गेले. त्याला फुलांचा हार आणि वॉटर कॅनन सॅल्यूट करून घरी सोडण्यात आलं होतं.
हे वाचा-'मी देवाला सांगेन, सात जन्म असतील तर तूच हवी', पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्याआज राज्यासाठी आनंदाचा दिवस: शिवराज चौहान
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व 44 कोरोना योद्धांशी बोलून सर्वांचे अभिनंदन व अभिनंदन केले. ते म्हणाले - निरोगी असलेल्या सर्व लोकांनी राज्यातील लोकांना हा संदेश दिला की भोपाळने कोरोनाविरूद्धच्या लढाईत जिंकण्याचे धाडस दाखवले आहे. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी आपण घरी सुरक्षित राहा. आम्ही कोरोनाला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करू. राज्यातील जनतेने घरीच राहण्याचे आवाहन केले जात आहे. लॉकडाऊन पालन करा.
हे वाचा-एकत्र जीवन-मरणाची घेतली होती शपथ, प्रियकराने प्रेयसीला दिलं विष पण स्वत: मात्र..
संपादन- क्रांती कानेटकर
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.