मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

BREAKING : राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी सोडला देश, अफगणिस्तानवर सत्तास्थापनेच्या समीप तालिबान

BREAKING : राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी सोडला देश, अफगणिस्तानवर सत्तास्थापनेच्या समीप तालिबान

तालिबान दहशतवादी संघटनेनं आतापर्यंत अफगाणिस्तानातील सर्व प्रमुख शहरांवर आपला ताबा घेतला आहे.

तालिबान दहशतवादी संघटनेनं आतापर्यंत अफगाणिस्तानातील सर्व प्रमुख शहरांवर आपला ताबा घेतला आहे.

तालिबान दहशतवादी संघटनेनं आतापर्यंत अफगाणिस्तानातील सर्व प्रमुख शहरांवर आपला ताबा घेतला आहे.

    Afghanistan Crisis Latest Update: अफगानिस्तानच्या राष्ट्रपती भवनात तालिबानी दहशतवादी संघटनेच्या सत्ता हस्तांतरित करण्याबाबत चर्चा सुरू आहे. अफगान मीडियानुसार, उच्च परिषदेचे प्रमुख अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्याबाबत म्हटलं जात आहे की, ते या प्रकरणात मध्यस्थीची भूमिका बजावत आहेत. यादरम्यान आलेल्या बातमीनुसार राष्ट्रपती अशरफ गनी (President Ashraf Ghani) यांनी देश सोडला आहे. मिळालेल्या बातमीनुसार, त्यांच्यासोबत स्पेशल सेक्रेटरी फैजन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्ला मोहिबदेखील असू शकतात. राष्ट्रपती अशरफ गनी तजाकिस्तानमध्ये जाण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर दुसरीकडे अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनात तालिबानी दहशतवादी संघटनेला सत्ता हस्तांतरित करण्याबाबत चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अली अहमद जलाली यांना नवीन अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून नियुक्त केले जाईल. या दरम्यान काळजीवाहक हे अंतर्गत आणि परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी स्वतंत्र व्हिडिओ क्लिपमध्ये आश्वासन दिले की, काबूलचे लोक सुरक्षित असतील. ते आंतरराष्ट्रीय मित्रांसह शहराचे रक्षण करीत आहेत. (President Ashraf Ghani leaves the country Taliban close to coming to power in Afghanistan ) हे ही वाचा-अफगाण सैन्याचं तालिबानसमोर लोटांगण; सर्वात मोठ्या चौथ्या शहरावरही ताबा यापूर्वी तालिबानने एका वक्तव्यात काबुलमधील रहिवाशांना घाबरण्याची गरज नाही. कारण त्यांचा हेतू सैन्य रुपात अफगान राजधानीमध्ये प्रवेश करण्याचा नाही आणि काबुलच्या दिशेने एका शांतीपूर्व आंदोलन होईल. तालिबानने रविवारी अफगनिस्तानच्या राजधानीच्या बाहेरील भागात प्रत्येक ठिकाणी आपले दल तैनात ठेवले आहेत. कारण अमेरिकेच्या नेतृत्वातील हल्ल्यात सत्ता सोडण्याच्या तब्बल 20 वर्षांनंतर काबुलच्या सशस्त्र समूहच्या अधिकग्रहणासाठी तयार नागरिक घाबरलेले आहेत. तालिबानचे प्रवक्ता सुहैल शाहीन यांनी सांगितलं की, या चर्चेदरम्यान राजधानीबाहेरील भागात लोकांचा बचाव केला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Taliban

    पुढील बातम्या