जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / संतापजनक : तालिबानी हे महिलांच्या प्रेतावरही बलात्कार करतात, भारतात आलेल्या अफगाणी महिलेनं मांडली व्यथा

संतापजनक : तालिबानी हे महिलांच्या प्रेतावरही बलात्कार करतात, भारतात आलेल्या अफगाणी महिलेनं मांडली व्यथा

संतापजनक : तालिबानी हे महिलांच्या प्रेतावरही बलात्कार करतात, भारतात आलेल्या अफगाणी महिलेनं मांडली व्यथा

तालिबानी (Taliban) त्यांना वाटेल त्या महिलेवर बलात्कार (Rape) करत असून प्रसंगी ते महिलांच्या प्रेतावरही बलात्कार (rape of dead bodies) करत असल्याची धक्कादायक माहिती अफगाणिस्तानमधून आलेल्या महिलेनं दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : तालिबानच्या (Taliban) ताब्यातील अफगाणिस्तानमधून (Afghanistan) स्वतःची सुटका करून घेत भारतात आलेल्या अफगाणिस्तानच्या महिलेनं (woman from Afghanistan) तालिबानचा खरा चेहरा उघड केला आहे. तालिबानी (Taliban) त्यांना वाटेल त्या महिलेवर बलात्कार (Rape) करत असून प्रसंगी ते महिलांच्या प्रेतावरही बलात्कार (rape of dead bodies) करत असल्याची धक्कादायक माहिती या महिलेनं दिली आहे. अफगाणिस्तानमध्ये पोलीस अधिकारी असलेल्या या महिलेनं भारतात आल्यावर ‘न्यूज 18’शी बोलताना आपल्या भावना आणि वेदना व्यक्त केल्या. तालिबानी पोलिसांत आपण काम करत होतो. मात्र तालिबाननं काबूलची सत्ता मिळवल्यानंतर आपल्या घरी येऊन कुटुंबीयांना धमक्या दिल्या. जर आपण पोलिसांत काम करणे थांबवले नाही, तर आपल्यासह आपल्या कुटुंबीयांना संपवण्याचा इशाराच तालिबानींनी दिल्याचं या महिलेनं म्हटलं आहे. मुस्कान, असं या महिलेचं नाव असून तालिबान करत असलेल्या अत्याचाराचा पाढाच तिनं वाचला आहे.

काय म्हणाली मुस्कान? तालिबानी नेत्यांना महिलांनी घराबाहेर पडणंच मान्य नसल्यामुळे महिलांनी कुठलंही काम करणं त्यांना सहन होत नाही. महिला ही तालिबानसाठी केवळ उपभोगाची वस्तू असून ते कुठल्याही घरातील महिलेला स्वतःच्या उपभोगासाठी उचलून नेत असल्याचं मुस्काननं सांगितलं आहे. प्रसंगी ते महिलांच्या प्रेतावरही बलात्कार करत असून स्त्री जिवंत आहे की मेलेली आहे, याने त्यांना काहीच फरक पडत नसल्याचं मुस्काननं म्हटलं आहे. आपल्यालाही तालिबानकडून धमकी आल्यामुळे आपण नोकरी सोडून भारतात आल्याचं तिनं सांगितलं. यापूर्वीही असेच अनुभव यापूर्वी 2018 साली एक महिला अफगाणिस्तानातून तालिबानींना वैतागून भारतात आश्रयाला आली होती. तिनेही असेच अनुभव माध्यमांना सांगितले होते. तिचे वडिल अफगाणिस्तानमधील पोलीस दलात कार्यरत होते. तालिबानींनी आपल्या वडिलांना गोळ्या घालून ठार मारल्याचं तिनं म्हटलं होतं. तर तिचे चुलते हे अफगाणिस्तान सैन्यासाठी डॉक्टर म्हणून काम होते. त्यांनाही तालिबाननं ठार केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात