मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

चीनच्या ‘वुहान लॅब’मधूच पसरला ‘कोरोना व्हायरस’, ब्रिटन गुप्तचर संस्थेचा खळबळजनक रिपोर्ट

चीनच्या ‘वुहान लॅब’मधूच पसरला ‘कोरोना व्हायरस’, ब्रिटन गुप्तचर संस्थेचा खळबळजनक रिपोर्ट

बाधित सदस्यांमुळे लहान मुलांमध्ये कोरोना पसरण्याचं प्रमाण कमी असून वृद्ध लोकांना जास्त भीती आहे असंही या अहवालात म्हटलं आहे.

बाधित सदस्यांमुळे लहान मुलांमध्ये कोरोना पसरण्याचं प्रमाण कमी असून वृद्ध लोकांना जास्त भीती आहे असंही या अहवालात म्हटलं आहे.

हा अपघात आहे की हा व्हायरस मुद्दाम पसरविण्यात आला याची सध्या जगभर चर्चा असून चीनवर चौफेर टीका होत आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
लंडन 05 एप्रिल : जगभर धुमाकूळ घालणारा कोरोना व्हायरस आपले हातपाय अजुनही पसरतच आहे. जगातल्या 200 पेक्षा जास्त देशांना त्याने ग्रासलं आहे. आत्तापर्यंत 65हजार माणसांचा मृत्यू झालाय. तर 12 लाख जणांना त्याची लागण झाली आहे. तर अडीच लाखांच्या जवळपास माणसं बरी झालीत. या व्हायरसवर अजुनही लस सापडलेली नाही. जगभर त्यावर संशोधन सुरू आहे. मात्र हा व्हायरस नेमका कसा पसरला? की चीनने मुद्दाम पसरविला? वुहानच्या प्रयोगशाळेत नेमकं काय झालं? असे असंख्य प्रश्न सध्या जगभर चर्चिले जात आहेत. अशा परिस्थितीत ब्रटिनच्या एका गुप्तचर अहवालातली अत्यंत स्फोटक माहिती बाहेर आलीय. वुहानच्या लॅबमधूनच हा व्हायरस पसरला असं त्यात म्हटलं आहे. चीनच्या वुहान शहरात विषाणू आणि त्यांच्या आजारांवर संशोधन करणाऱ्या दोन मोठ्या लॅब आहेत. त्यात शास्त्रज्ञांना इबोला, निपाह, सॉर्स सारख्या घातक व्हायरसवर संशोधन करत होते. त्यांना एक नवीनच व्हायरस सापडला. वटवाघळांमध्ये असलेल्या व्हायरसशी त्याचं साम्य आढळून आलं. जानेवारी महिन्यातली ही घटना असल्याचं बोललं जातंय. याच लॅबमधून तो व्हायरस पसरला असं ब्रिटनच्या गुप्तचर अहवाल म्हटल्याचं वृत्त 'डेली मेल'ने दिलं आहे. हा अहवाल ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना देण्यात आला आहे. वुहानच्या या लॅब्स पासून प्राण्यांचे बाजार जवळ आहेत. तिथूनच त्याची लागण झाली असंही म्हटलं जातं. हा अपघात आहे की हा व्हायरस मुद्दाम पसरविण्यात आला याची सध्या जगभर चर्चा असून चीनवर सर्व जगातून टीका होत आहे. तबलिगीतील सहभागींनी शोधण्यासाठी पोलिसांची नवी क्लृप्ती, शब-ए-बारातची केली अपील जगात कोरोनाने हाहाकार माजवला असून जवळपास 205 देशांमध्ये व्हायरस पसरला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्याची चिन्हे दिसत नसून यामुळे आतापर्यंत जगात 65 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 12 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतातही कोरोना पसरत चालला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येनं भारतात 3 हजारांचा आकडा पार केला आहे. आतापर्यंत भारतात 75 जणांचा मृत्यू झाला आहे.

माणसातला देव! घरच्यांनी साथ सोडली, तरी डॉक्टरांनी रुग्णाला हातांनी भरवलं जेवण

कोरोनाचा फटका सर्वाधिक इटली आणि स्पेन या देशांना बसला आहे. इटलीत मृत्यूचे प्रमाण 12.3 टक्के इतकं तर फ्रान्समध्ये 10 टक्के इतकं आहे. भारतात कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत मृत्यूचं प्रमाण 2.8 टक्के इतकं आहे. जगातील मोठे पाच देश कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत जवळपास 14 हजार लोकांचा तर स्पेनमध्ये 12 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.
First published:

पुढील बातम्या