मराठी बातम्या /बातम्या /देश /

तबलिगीतील सहभागींनी शोधण्यासाठी पोलिसांची नवी क्लृप्ती, मुस्लीम कुटुंबीयांना शब-ए-बारातची केली अपील

तबलिगीतील सहभागींनी शोधण्यासाठी पोलिसांची नवी क्लृप्ती, मुस्लीम कुटुंबीयांना शब-ए-बारातची केली अपील

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार एकूण कोरोना पॉझिटिव्हपैकी 30 टक्के रुग्ण हे तबलिगी कार्यक्रमासंबंधित आहेत

  • Published by:  Meenal Gangurde
नवी दिल्ली, 5 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) देशभरात लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला आहे. यादरम्यान लोकांनी घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे. लॉकडाऊनदरम्यान दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) शब-ए-बारात (Shab-E-Barat) म्हणजेच 8 आणि 9 एप्रिलदरम्यान मुस्लिमांनी घराबाहेर न पडण्याचं अपील केलं जात आहे. यासाठी पोलिसांकडून एक पोस्टर जारी करण्यात आलं आहे. त्याद्वारे दिल्ली पोलीस निजामुद्दीन तबलिगी जमात या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना मिळालेल्या डेटाच्या माध्यमातून शोधत आहे. याबाबतचे वृत्त एनडीटीव्ही येथे प्रसिद्ध झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांची क्राइम ब्रांच मॅपिंगच्या माध्यमातून मरकझमध्ये आलेल्या लोकांची ओळख पटवत आहेत. ज्यांच्या मोबाइलमध्ये GPS लोकेशन गेल्या अनेक दिवसांपूर्वी मरकजच्या जवळपास दिसत आहे, अशा लोकांची ओळख पटवण्यात येत आहे. मॅपिंक प्रक्रियेत अन्य राज्यांतील पोलीस दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचला मदत करीत आहे. संबंधित - राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत, काय आहे हॉस्पिटलची स्थिती, पाहा PHOTOS कोरोनाव्हायरसच्या संकटाकडे दुर्लक्ष करीत मार्च महिन्यात तबलिगी जमात कार्यक्रमात जवळपास 9000 जणं सहभागी झाले होते. यामध्ये देश व परदेशातूनही अनेक लोक आले होते. सध्या या सर्वांचा शोध घेतला जात आहे. शिवाय जे सापडले त्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे. तबलिगी जमातच्या कार्यक्रमामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.  काल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार एकूण कोरोना पॉझिटिव्हपैकी 30 टक्के रुग्ण हे तबलिगी कार्यक्रमामुळे उद्भवलेले आहेत. संबंधित -  पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर इंदुरीकर महाराजांनी लिहिलं पत्र, म्हणाले...
First published:

Tags: Corona virus in india

पुढील बातम्या