मराठी बातम्या /बातम्या /विदेश /डोमिनिका हायकोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर मेहुल चोक्सी अँटिग्वामध्ये दाखल, भारताला मोठा धक्का

डोमिनिका हायकोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर मेहुल चोक्सी अँटिग्वामध्ये दाखल, भारताला मोठा धक्का

Mehul Choksi: मेहुल चोक्सी (Mehul Choksi) ला डोमिनिका (Dominica)हायकोर्टानं आरोग्याच्या कारणास्तव अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळाल्यानंतर चोक्सी अँटिग्वा अँड  बार्बुडा (Antigua and Barbuda) येथे पोहोचला आहे.

Mehul Choksi: मेहुल चोक्सी (Mehul Choksi) ला डोमिनिका (Dominica)हायकोर्टानं आरोग्याच्या कारणास्तव अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळाल्यानंतर चोक्सी अँटिग्वा अँड बार्बुडा (Antigua and Barbuda) येथे पोहोचला आहे.

Mehul Choksi: मेहुल चोक्सी (Mehul Choksi) ला डोमिनिका (Dominica)हायकोर्टानं आरोग्याच्या कारणास्तव अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळाल्यानंतर चोक्सी अँटिग्वा अँड बार्बुडा (Antigua and Barbuda) येथे पोहोचला आहे.

अँटिग्वा, 15 जुलै: पीएनबी बँक (PNB Scam) घोटाळ्याप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) ला डोमिनिका (Dominica) हायकोर्टानं आरोग्याच्या कारणास्तव अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळाल्यानंतर चोक्सी अँटिग्वा अँड बार्बुडा (Antigua and Barbuda) येथे पोहोचला आहे. डोमिनिकामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याच्या आरोपाखाली त्याला तेथे 51 दिवसांसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. भारतातून फरार झाल्यानंतर चोक्सी 2018 पासून अँटिग्वा आणि बार्बुडा येथे वास्तव्यास आहे. त्याने तिथलं नागरिकत्वही घेतले आहे.

चोक्सीवर डोमिनिकामध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याचा आरोप आहे. तर चोक्सीचं अपहरण करण्याचा कट होता, असा दावा त्याच्या वकिलानं केला आहे. डोमिनिका हायकोर्टाने चोक्सी (62) ला त्याच्या उपचारासाठी जामीन मंजूर केला आहे.

अँटिग्वाच्या न्यूजरूमच्या वृत्तानुसार, 10 हजार ईस्टर्न कॅरिबियन डॉलर्स (जवळपास पावणे तीन लाख) भरल्यानंतर कोर्टाने चोक्सीला अँटिग्वा येथे जाण्यास परवानगी दिली. जामीन मिळण्यासाठी चोक्सीनं आपला मेडिकल रिपोर्ट न्यायालयात सादर केला होता. ज्यात 'सीटी स्कॅन'चा समावेश होता. अहवालात त्याच्या 'हेमाटोमा' (मेंदूशी संबंधित आजार) ची स्थितीत समस्या असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा- संजय निरुपम यांच्या नव्या ट्विटमुळे काँग्रेस पक्षाला सुखद धक्का

डोमिनिकामध्ये चोक्सीच्या उपचारावरील सुविधा उपलब्ध नाही

डॉक्टरांनी ‘न्यूरोलॉजिस्ट’ आणि ‘न्यूरोसर्जिकल’ सल्लागाराद्वारे चोक्सीच्या मेडिकल स्थितीचा त्वरित आढावा घेण्याचा सल्ला दिला होता. 'सीटी स्कॅन' रिपोर्ट 29 जून रोजी देण्यात आला होता, त्यावर डोमिनिकाच्या प्रिन्सेस मार्गारेट हॉस्पिटलमधील डॉक्टर येरेन्डी गॅले गुटेरेझ (Yerandy Galle Gutierrez)आणि रेने गिलबर्ट व्हेरेन्स (Rene Gilbert Veranes)यांनी स्वाक्षरी केली होती. या आजारावरील उपचार सुविधा सध्या डोमिनिकामध्ये उपलब्ध नाहीत, असे रिपोप्टमध्ये म्हटलं होतं.

हेही वाचा- विद्येचं माहेर घर असलेल्या पुण्यात प्राध्यापकाकडूनच विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन

अपहरण नाट्यामुळे आला होता चर्चेत

काही दिवसांपूर्वी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) त्याच्या कथित अपहरण (Kidnapping) नाट्यामुळे चर्चेत आला होता. अँटीग्वामधून (Antigua) डोमिनिकाला गेलेल्या चोक्सीनं आपल्याला भारतात परत नेण्यासाठी भारत सरकारनं जबरदस्तीनं डोमिनिकाला (Dominica) नेल्याचा आरोप केला होता. मात्र अँटीग्वा सरकार त्याला परत भारतात पाठविण्यासाठी तयार असल्याचं त्यानं स्वतःच आपल्या अपहरण नाट्याची कहाणी तयार केल्याची धक्कादायक माहिती भारतीय गुप्तचर स्रोतांनी उघडकीस आणली होती. सीएनएन-न्यूज 18 ला त्यांनी ही माहिती दिली असून या प्रकरणात चोक्सीला मदत करणाऱ्या एका फरारी एजंटचे फोटोही सीएनएन-न्यूज 18 ला मिळाले.

First published:

Tags: Money, Money fraud, Pnb bank, Scam