जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / नाना पटोले यांना संजय निरुपमांचा पाठिंबा?, Surprise ट्विटनं काँग्रेस पक्षात आनंद

नाना पटोले यांना संजय निरुपमांचा पाठिंबा?, Surprise ट्विटनं काँग्रेस पक्षात आनंद

नाना पटोले यांना संजय निरुपमांचा पाठिंबा?, Surprise ट्विटनं काँग्रेस पक्षात आनंद

Sanjay Nirupam Tweet: अशातच नेहमी पक्षाच्या विरोधात बोलणारे काँग्रेस नेते (Congress Leader) संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी आज पक्षाची बाजू मांडली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 जुलै: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आगामी निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) शीतयुद्ध सुरु आहे. नाना पटोले यांच्यानंतर (Congress) काँग्रेस मुंबई अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनीही स्वबळाची भाषा केली. अशातच नेहमी पक्षाच्या विरोधात बोलणारे काँग्रेस नेते (Congress Leader) संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी आज पक्षाची बाजू मांडली आहे. संजय निरुपम हे नेहमीच काँग्रेसच्या विरोधात बोलून पक्षाला घरचा आहेर देताना पाहिलं आहे. मात्र आता त्यांनी बऱ्याच दिवसांनी पक्षाची बाजू उचलून धरली आहे. त्यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे नक्कीच पक्षाला एक सुखद धक्का बसला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, सर्व राजकीय पक्षांना आपला पक्ष वाढवायचा आहे. काँग्रेसही स्वबळावर स्थानिक निवडणूक लढण्याची तयारी करत आहे. जेणेकरून पाया मजबूत व्हावा. यात चुकीचं काय आहे? कॉंग्रेसच्या या रणनीतीवर दोन्ही मित्रपक्षांना आक्षेप का आहे? कॉंग्रेस नेहमी त्यांच्या मागे राहावा का?

जाहिरात

असं ट्विट करत संजय निरुपम यांनी हॅशटॅग स्वबळ असा शब्द वापरला आहे. स्वबळाची घोषणा केल्यानंतर अजूनही वादाच्या ठिणग्या उडताना दिसत आहेत. राज्यातील आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल, अशी घोषणा पटोले यांनी केल्यानंतर सत्ताधारी आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावर टीकेची झोड उठवली. हेही वाचा-  विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत मोठ्या हालचाली 2014 मध्ये आमच्यासोबत विश्वासघात झाला. तसा विश्वासघात पुन्हा होऊ नये म्हणून आम्ही पूर्ण तयारीनिशी राहणार आहोत. जो काही निर्णय घ्यायचा तो पार्टी स्टॅटेजीच्या आधारे घेऊ, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात