शिकागो, 21 जुलै: मानवी शरीर ही अत्यंत गुंतागुंतीची आणि अद्भुत अशी रचना आहे. त्यातल्या एखाद्या पेशीत बिघाड निर्माण झाला, तरी आपल्याला त्रास होतो. शरीराच्या अंतर्गत रचनेचा फॉर्मही ठरलेला असतो. त्यात काही बदल झाला, तरीही माणसाला त्रास होऊ शकतो; पण काही वेळा जन्मजातच एखाद्या व्यक्तीच्या शरीराची अंतर्गत रचना सर्वसामान्य शरीररचनेपेक्षा वेगळी असू शकते. त्याचंच एक उदाहरण अमेरिकेत शिकागोमध्ये राहणाऱ्या क्लेअर मॅक (Claire Mac) या 19 वर्षीय तरुणीला अनुभवायला मिळालं. दोन महिने खोकला असल्याने ती डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेली होती. तेव्हा तिला डॉक्टरांनी जे सांगितलं, तेव्हा त्यावर तिचा विश्वासच बसला नाही; मात्र ते खरं होतं. तिचं हृदय (Heart) शरीरातल्या निश्चित जागी नव्हतं. ते छातीच्या उजवीकडे असल्याचं तपासणीत दिसून आलं होतं. या दुर्मीळ स्थितीला डेक्स्ट्रोकार्डिया (Dextrocardia) असं म्हणतात. डेक्स्ट्रोकार्डिया असलेल्या जगातल्या दुर्मीळ व्यक्तींपैकी आपण एक आहोत, हे कळल्यावर तिला धक्काच बसला. दी सन ने याबाबत वृत्त दिलं आहे. हे वाचा- 21 वर्षांचा होईपर्यंत माहितीच नव्हतं की त्याची मोठी बहीण खरंतर आहे त्याची आई! जून महिन्यात क्लेअरचा एक अपघात झाला होता. तसंच, तिला जवळपास दोन महिने खोकल्याचाही त्रास होता. म्हणून ती तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये गेली. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी फुप्फुसांच्या (Lung Infection) संसर्गाचा निष्कर्ष काढला आणि तिला एक्स-रे काढायला सांगितलं. एक्स-रे काढल्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात आलं, की क्लेअरचं हृदय डाव्या नव्हे, तर उजव्या बाजूला आहे. हे वाचा- एक मोलाचा क्षण आणि बदललं तिचं संपूर्ण आयुष्य; लॉटरी लागल्यानं बनली करोडपती डॉक्टरांनी जेव्हा पहिल्यांदा क्लेअरला हे सांगितलं, तेव्हा तिला ते तिची फिरकी घेत असल्यासारखं वाटलं; मात्र जेव्हा डॉक्टरांनी तिला डेक्स्ट्रोकार्डियाबद्दल सांगितलं, तेव्हा तिचा विश्वास बसला. पूर्वी एका डॉक्टरनी तिला तिच्या हृदयाची धडधड उजव्या बाजूला जास्त प्रमाणात ऐकू येत असल्याचं सांगितलं होतं; मात्र तेव्हा तिने ती गोष्ट फारशी मनावर घेतली नव्हती. आता मात्र टेस्टमुळे ती गोष्ट उघडच झाली. डेक्स्ट्रोकार्डिया म्हणजे काय? डेक्स्ट्रोकार्डिया (Dextrocardia) ही एक दुर्मीळ स्थिती (Rare Medical Condition) आहे. सर्वसाधारणपणे माणसाचं हृदय छातीच्या डाव्या बाजूला असतं. डेक्स्ट्रोकार्डिया असलेल्या व्यक्तींचं हृदय डाव्या बाजूला असतं. ज्यांच्यामध्ये ही स्थिती असते, ती जन्मजात असते. जगभरात केवळ एक टक्का व्यक्तींना ही समस्या असू शकते. यामागचं कारण अस्पष्ट असून, संबंधित व्यक्तीचा MRI स्कॅन किंवा X-Ray केला गेला, तरच ही गोष्ट लक्षात येते. हृदय उजव्या बाजूला असलेल्या व्यक्तींना हृदय, अन्य अवयव किंवा पचन संस्थेचे विकार असू शकतात. त्यांना फुप्फुसांचा संसर्ग वारंवार होण्याची शक्यता असते. काही व्यक्तींना श्वास घ्यायला त्रास होणं, थकवा किंवा ओठ निळे पडणं अशा समस्या जाणवू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.