मराठी बातम्या /बातम्या /मनी /एक मोलाचा क्षण आणि बदललं तिचं संपूर्ण आयुष्य; लॉटरी लागल्यानं बनली करोडपती

एक मोलाचा क्षण आणि बदललं तिचं संपूर्ण आयुष्य; लॉटरी लागल्यानं बनली करोडपती

या महिलेचं आयुष्य बदलून टाकणाऱ्या प्रसंगावर टाकलेला हा दृष्टिक्षेप.

या महिलेचं आयुष्य बदलून टाकणाऱ्या प्रसंगावर टाकलेला हा दृष्टिक्षेप.

या महिलेचं आयुष्य बदलून टाकणाऱ्या प्रसंगावर टाकलेला हा दृष्टिक्षेप.

    वॉशिंग्टन : पैसे कमवण्यासाठी (Money Earning) परिश्रम सगळेच करत असतात. मात्र आपल्याला आयुष्यात एकदा तरी लॉटरी (Lottery) लागावी, आणि क्षणार्धात आपण लखपती किंवा करोडपती व्हावे, असं स्वप्न प्रत्येकजण रंगवत असतो. अगदी लाखोंपैकी एकाच्या नशीबात ही संधी येते, आणि तो लखपती किंवा करोडपती होतो. असाच काहीसा किस्सा अमेरिकेत (America) उबर ईटसमध्ये (Uber Eats) काम करणाऱ्या 47 वर्षीय महिलेच्या आयुष्यात घडला आणि तिचं आयुष्य क्षणार्धात बदलून गेलं. या महिलेचं आयुष्य बदलून टाकणाऱ्या प्रसंगावर टाकलेला हा दृष्टिक्षेप.

    युएसमधील मेरीलँड (Merry Land) येथे राहणाऱ्या एका महिलेचं आयुष्य लॉटरी लागल्यानं पूर्णतः बदलून गेलं आहे. ‘त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे काम करत होते. लॉटरीचं तिकीट खरेदी करुया, असा विचार माझ्या मनात सहज आला. मी तत्काळ क्विक सेस मार्टजवळ थांबले आणि तिकीट खरेदी केलं. त्यानंतर मी लॉटरी ॲपचा वापर करुन कमाल बक्षीस श्रेणीतील स्क्रॅच ऑफरची यादी ओपन केली आणि त्यातील 1 ते 10 डॉलरचा कॅश गेम (Cash Game) निवडला. मी या पूर्वी लॉटरीच्या माध्यमातून छोटी छोटी बक्षिसं जिंकली आहेत. त्यात मी आतापर्यंत सर्वात जास्त म्हणजे 1500 डॉलरचे बक्षीस असलेली लॉटरी जिंकले आहे. अजून एकदा प्रयत्न करावा, या विचाराने मी पुन्हा लॉटरीचे तिकीट खरेदी केलं, आणि नशीबानं साथ दिल्याने करोडपती (Crorepati) झाले,’ असं या महिलेनं सांगितलं.

    हे वाचा - चांगल्या रिटर्नसह या 5 कारणांमुळे FD आहे बेस्ट! वाचा का आहे ही स्मार्ट गुंतवणूक

    ‘त्या दिवशीदेखील माझं नियमित काम सुरु होते. मात्र काही क्षणांत माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं. एका आठवड्यापूर्वी खरेदी केलेल्या लॉटरीच्या तिकीटाचा तपशील सहज तपासला आणि त्याचे बक्षीस मी जिंकले आहे, हे जेव्हा मला समजले, तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नाही,’ अशी प्रतिक्रिया या महिलेनं व्यक्त केल्याचं आज तकने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

    उबर ईटसमध्ये डिलिव्हरीचं काम करणाऱ्या या पाच मुलांच्या आईने 2,50,000 डॉलर म्हणजेच 1,87,19,600 रुपये जिंकले असल्याचे लॉटरी विभागातील अधिकाऱ्यांनी घोषित केले. हे समजताच या महिलेनं आनंद व्यक्त केला. मी आता उबर ईटसमध्ये काम करु इच्छित नाही, असं या महिलेनं पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

    या लॉटरीच्या बक्षीसरुपी रकमेतून मी सर्वप्रथम काही बिलं भरणार आहे. तसेच घरासाठी डाऊन पेमेंट देणार आहे. त्यानंतर उरलेल्या पैशातून माझ्या मुलांना अर्थिक मदत करणार असल्याचं या महिलेनं स्पष्ट केलं.

    First published:
    top videos

      Tags: Money