Home /News /videsh /

भयंकर! एअरपोर्टच्या बाथरूममध्येच प्रसुती; तोंडात टॉयलेट पेपर कोंबुन नवजात बाळाची हत्या

भयंकर! एअरपोर्टच्या बाथरूममध्येच प्रसुती; तोंडात टॉयलेट पेपर कोंबुन नवजात बाळाची हत्या

बाळाने जगात पाऊल ठेवल्याच्या काही मिनिटात आईने त्याची अत्यंत निघृणपणे हत्या केली.

    नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : मुलाला सर्वाधिक कोणी जीव लावत असेल तर ती त्याची आई (Mother Love) असते. मात्र जपानमधील टोकियो (Japan Crime News) येथे एका आईने तिच्या बाळाने जगात पाऊल टाकताच त्याची निघृणपणे हत्या केली. 23 वर्षीय तरुणीने टोकियो विमानतळावर बाळाला जन्म दिला आणि टॉयलेट पेपर तोंडात कोंबून त्याची हत्या (Baby Murder) केली. याबाबत तरुणीने पोलिसांसमोर याची कबुली दिली. (mother killed new born baby) डेली स्टारमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, ही घटना 2019 ची आबे. टोकियोमधील हानेडा एअरपोर्टवर 23 वर्षीय तरुणीने बाळाला जन्म दिला. ही तिची अनवॉन्टेंड प्रेग्नेन्सी असल्या कारणाने बाळाच्या जन्मानंतर ती घाबरली. तिने अत्यंत घृणास्पद प्लान आखला. तिने एअरपोर्टच्या वॉशरूममध्ये बाळाच्या तोंडात टॉयलेट पेपर कोंबला आणि त्याची हत्या केली. यानंतर बाळाचा मृतदेह जवळील एका गार्डनमध्ये दफन केला. (Delivery in the airport bathroom Killing a newborn baby ) हे ही वाचा-आधी तोंडात बोळा कोंबला मग..; प्रेमात अडसर ठरणाऱ्या मुलाला आईनं निर्दयीपणे संपवल गेल्या वर्षी बाळाचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी या तरुणीला ताब्यात घेतलं. 2019 पासून हे प्रकरण कोर्टात आहे. आता मात्र तरुणीने कोर्टाला सत्य कथन केलं आहे. तिने सांगितलं की, नोकरीच्या मुलाखतीसाठी ती टोकियोला जात होती. मात्र शहरात उतरल्याच्या काही वेळात तिने बाळाला जन्म दिला. तिने कोर्टात सांगितलं की, मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की, मी गर्भपात करू शकत नाही. कारण जेव्हा प्रेग्नेन्सीबद्दल कळाल होतं तेव्हा 22 आठवडे निघून गेले होते. जर माझ्या आई-बाबांना याबद्दल कळालं तर त्यांना झटका बसेल. त्यामुळे बाळाची हत्या करण्यापलीकडे माझ्याकडे कोणताही मार्ग नव्हता. कोर्टाने तरुणीला स्वत:च्याच बाळाच्या हत्येसाठी दोषी घोषित केलं आहे. तरुणीला या प्रकरणात किमान 5 वर्षे वा आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Japan, Mother, Murder

    पुढील बातम्या