न्यूयॉर्क, 6 ऑक्टोबर : तिघांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला मृत्यूचं (Death injection to murder convict) इंजेक्शन देऊन त्याचा जीव घेण्यात आल्याच्या घटनेची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या आऱोपीने काही वर्षांपूर्वी अत्यंत थंड डोक्याने (Cold blooded murder of three citizens) तिघांचा बळी घेतला होता. त्यानंतर या आरोपीवर खुनाचा खटला चालवण्यात आला. अखेर आरोपीचा दोष सिद्ध झाला आणि या COLD BLOODED MURDERS साठी न्यायालयाने आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. असे केले खून एका अमेरिकी नागरिकानं हातोडा, सुरा आणि बंदुकीच्या साहाय्यानं तिघांचा बळी घेतला होता. हे खून केल्याप्रकऱणी कोर्टानं आरोपीला दोषी ठरवलं. 61 वर्षांच्या अर्नेस्ट ली जॉनसन याला या प्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. अर्नेस्टने ज्या प्रकारे हे खून केले आहेत, ते पाहता त्याला कुठल्याही प्रकारची दयामाया दाखवता येणार नाही, असं कोर्टानं म्हटलं आहे. हे खून अत्यंत थंड डोक्याने आणि निर्दयीपणे केलेले असून मानवतेला काळीमा फासणारी ही घटना असल्याचं अमेरिकेतील न्यायालयानं म्हटलं आहे. अर्नेस्टला आठवला स्वर्ग अर्नेस्टनं केलेल्या खुनांसाठी त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यापूर्वी त्याला स्वर्ग आठवला. आपण आता स्वर्गात चाललो आहोत, असं त्यानं तुरुंगातील कैद्यांना आणि आजूबाजूच्या पोलिसांना सांगितलं. त्यानंतर त्याला विषारी इंजेक्शन देण्यात आलं. काही वेळाने त्याचा श्वास मंदावत गेला आणि अर्नेस्टचा मृत्यू झाला, असं एका अमेरिकी वृत्तवाहिनीनं म्हटलं आहे. हे वाचा - लेकाच्या सुखासाठी सुनेसह चौघांची हत्या; प्रकरण उलटल्याने स्वत:लाच दिली शिक्षा असा केला होता खून रिपोर्टनुसार अर्नेस्टनं 1994 साली कोलंबियातील एका जनरल स्टोअरमध्ये तीन कर्मचाऱ्यांची हत्या केली होती. चोरीच्या हेतूने त्याने या हत्या केल्या होत्या. त्यामध्ये तीन कर्मचाऱ्यांचा खून करून त्यांचे मृतदेह एका फ्रीजमध्ये कोंबून ठेवले होते. त्यानंतर स्टोअरमधील कॅश घेऊन तो पसार झाला होता. मृत्युदंडाची शिक्षा टाळण्यासाठी त्याने सर्व तरतुदींचा वापर करत अर्ज केले होते. मात्र अखेर त्याला शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.