Home /News /videsh /

Davos आर्थिक परिषदेत महाविकास आघाडीची मोठी कामगिरी, राज्यासाठी 80 हजार कोटींचे करार

Davos आर्थिक परिषदेत महाविकास आघाडीची मोठी कामगिरी, राज्यासाठी 80 हजार कोटींचे करार


दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राची कामगिरी सरस ठरली. आज उर्जा निर्मिती क्षेत्
दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राची कामगिरी सरस ठरली. आज उर्जा निर्मिती क्षेत्रात 50 हजार कोटींचे करार करण्यात आले. रात 50 हजार कोटींचे करार करण्यात आले.

दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राची कामगिरी सरस ठरली. आज उर्जा निर्मिती क्षेत् दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राची कामगिरी सरस ठरली. आज उर्जा निर्मिती क्षेत्रात 50 हजार कोटींचे करार करण्यात आले. रात 50 हजार कोटींचे करार करण्यात आले.

दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राची कामगिरी सरस ठरली. आज उर्जा निर्मिती क्षेत्रात 50 हजार कोटींचे करार करण्यात आले.

    दावोस, 24 मे : महाविकास आघाडी सरकारने (mva government) स्वित्झर्लंड येथील दावोस जागतिक आर्थिक परिषदेत (davos economic council switzerland 2022) राज्यासाठी मोठी कामगिरी बजावली आहे. ऊर्जा निर्मिती क्षेत्रात 50 हजार कोटींची गुंतवणूक करार महाराष्ट्रासाठी करण्यात आले आहे. तीन दिवसांमध्ये एकूण 80 हजार कोटींचे गुंतवणूक करार (80000 crore investment agreement) झाले आहे. दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राची कामगिरी सरस ठरली. आज उर्जा निर्मिती क्षेत्रात 50 हजार कोटींचे करार करण्यात आले. यानिमित्ताने तीन दिवसांत सुमारे 30 हजार कोटींचे करार पूर्ण झाले आहेत. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उर्जामंत्री नितीन राऊत उपस्थित होते. उर्जा निर्मितीसाठी 50 हजार कोटी गुंतवणूक करण्यासाठी रि न्यू पॉवर कंपनीने राज्य शासनासोबत करार केला. कंपनीचे संचालक सुमंत सिन्हा उपस्थित होते. याद्वारे राज्यात 10 ते 12 हजार मेगा वॅट ऊर्जा निर्माण होणार आहे. याशिवाय आज इंडोनेशियाच्या एशिया पल्प अँड पेपर कंपनीने रायगड जिल्ह्यात सुमारे 1.5 बिलियन युएसडी गुंतवणुकीसाठी करार केला. याशिवाय वेदांता ग्रुपचे संचालक अनिल अग्रवाल यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणाऱ्या बॅटरीसंबधी अमरा राजा ग्रुपचे संचालक जय गल्ला यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. ('बोगस बियांणाचा पुरवठा करणाऱ्या कृषी केंद्रावर धाडी टाका') दरम्यान,  राज्य सरकारने राज्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये आणि मुंबईतील महापालिका शाळांमध्ये डिजिटल सामग्री सादर करण्यासाठी बायजूस यांच्या सोबत सामंजस्य करार केला. याप्रसंगी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल, सचिव (शालेय शिक्षण) रणजित सिंग देओल व बायजूसचे संस्थापक बायजू रवींद्रन व दिव्या रवींद्रन उपस्थित होते. शिवाय राज्याने जागतिक ग्रीन बिल्डिंग कौन्सिलसोबत ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी, राज्याला शून्य उत्सर्जन लक्ष्य साध्य करण्यास मदत करण्यासाठी सहकार्य करारावर स्वाक्षरी केली. (सैन्यात झाली होती निवड, पण नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू) यावेळी मुख्यमंत्र्यांचे अति. मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, अति. मुख्य सचिव ( उद्योग ) श्री बलदेव सिंह, महावितरणचे व्यवस्थपकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे सीईओ डॉ पी. अनबलगन, सह मुख्य कार्यकारी अधिकारी पी.डी. मलिकनेर आणि महाव्यवस्थापक (पणन व जनसंपर्क) अभिजित घोरपडे या सोहळ्यात स्वाक्षरी करणाऱ्या कंपन्यांच्या उद्योग प्रतिनिधींसह उपस्थित होते.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या