मुंबई 21 ऑगस्ट : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा ब्रेन म्हटलं जाणार्या राजकीय विश्लेषक अलेक्झांडर दुगिन यांच्या मुलीच्या कारमध्ये शनिवारी उशिरा मॉस्कोमध्ये स्फोट झाला. या स्फोटात दरियाचा मृत्यू झाला. मोझायस्कॉय हायवेवर रात्री ९.४५ च्या सुमारास दरिया दुगिनाच्या कारचा स्फोट झाला. हा स्फोट रस्त्याच्या मधोमध झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. स्फोट एवढा जोरदार होता की कार आगीच्या गोळ्यात बदलली. Breaking : सोमालियामध्ये मुंबईसारखा दहशतवादी हल्ला, हॉटेलमध्ये बॉम्ब ब्लास्ट आणि अंदाधुंद गोळीबार या कारमध्ये अलेक्झांडर दुगिन बसणार होते पण अचानक त्यांनी या गाडीत न बसण्याचा निर्णय घेतला, असं सांगण्यात येत आहे. अलेक्झांडर दुगिन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे ब्रेन असल्याचं म्हटलं जातं. हा अलेक्झांडर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचं बोललं जात आहे. अलेक्झांडर हे व्लादिमीर पुतिन यांचा उजवा हात असल्याचं म्हटलं जातं. अलेक्झांडर यांची मुलगी मॉस्कोमध्ये स्फोटात मरण पावली.
Looks like there was an assassination attempted on Alexander Dugin that killed his daughter, fair to say things will escalate a lot from here!
— Luke Rudkowski (@Lukewearechange) August 20, 2022
pic.twitter.com/YOZNOkwvKI
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन जे विचार करतात किंवा निर्णय घेतात त्यामागे अलेक्झांडर दुगिन असल्याचं सांगितलं जात आहे. या हल्ल्यात कुठेतरी अलेक्झांडर हे एकमेव लक्ष्य होते. असं सांगण्यात येत आहे की एक मोठा स्फोट झाला, यात त्यांची मुलगी दरिया दुगिनच्या शरीराच्या अक्षरशः चिंध्या उडाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर काही क्षणातच त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. या हल्ल्यामागील सर्व दुवे जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे.