नजर हटी, दुर्घटना घटी; भरधाव ट्रकने तिघांना चिरडलं, भीषण अपघाताचा CCTV VIDEO

नजर हटी, दुर्घटना घटी; भरधाव ट्रकने तिघांना चिरडलं, भीषण अपघाताचा CCTV VIDEO

या दुर्घटनेनंतर ट्रक चालक पळून जाण्याच्या तयारीत होता मात्र तिथल्या लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केलं.

  • Share this:

जयपूर, 28 फेब्रुवारी : भरधाव ट्रकने दुचाकीवरील दोन तरुणींसह फुटपाथवरील एक तरुणाला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दुर्घटनेनंतर ट्रक चालक पळून जाण्याच्या तयारीत होता मात्र तिथल्या लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केलं. राजस्थानमधील जयपूर इथे गुरुवारी रात्री उशिराच्या सुमारास हा अपघात घडला. या दुर्घटनेत फुटपाथवरील साखरझोपेत असलेले दोन जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार भरधाव वेगात असलेल्या ट्रकसमोरून दुचाकी जात असताना या ट्रकचालकानं धडक दिली. दुचाकीवरील दोन्ही तरुणी खाली पडल्या ट्रक चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि त्याने तरुणींना चिरडलं. घाबरलेल्या ट्रक चालकानं गाडीवर नियंत्रण मिळवेपर्यंत फुटपाथवरील एका तरुणाला चिरडलं तर दोन जण या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हेही वाचा-धक्कादायक खुलासा, आयबी कॉन्स्टेबल अंकित शर्मांच्या शरीरावर चाकूचे 18 वार

या व्हिडिओमध्ये आपण हा अपघात किती भीषण झाला असेल हे पाहू शकता. या दोन्ही तरुणी एका खासगी कंपनीत कामाला होत्या. घरी जाण्यास उशीर झाल्यानं या दोन्ही तरुणी घरी निघाल्या होत्या. त्याचवेळी बाजूने आलेल्या ट्रकने दोन्ही तरुणींना धडक देत चिरडलं आणि त्यांचा मृत्यू झाला तर फुटपाथवर असलेल्या तरुणालाही ह्या ट्रकने चिरडल्यानं तरुणाचा मृत्यू झाला आहे. फुटपाथवर या तरुणाची पत्नी आणि मुलगा झोपला होता ते मात्र या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. तर ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.

First published: February 28, 2020, 1:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading