VIDEO : धक्कादायक! थुंकण्यासाठी उठलेल्या तरुणाच्या डोक्यात कोसळला स्लॅब

VIDEO : धक्कादायक! थुंकण्यासाठी उठलेल्या तरुणाच्या डोक्यात कोसळला स्लॅब

या तरुणावर सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • Share this:

वलसाड, 28 फेब्रुवारी : जीर्ण इमारतीचा स्लॅब कोसळून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही भीषण दुर्घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बिल्डिंगखाली बोलत असलेला तरुण थुंकण्यासाठी उठला असताना इमारतीचा काही भाग त्याच्या अंगावर अचानक कोसळला. या दुर्घटनेत तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उमरगाव इथल्या कस्तुर प्लाझा इमारतीचा स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडली आहे.

ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की तरुण आधी खुर्चीवर बोलत बसला होता. पिंक टाकण्यासाठी हा तरुण उठला त्याचवेळी तो फोनवर बोलत असताना त्याचं आजूबाजूला लक्ष नव्हतं अचानक त्यांच्या डोक्यावर स्लॅबचा हिस्सा कोसळला. तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना यातून वाचवलं आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

हेही वाचा-दिल्लीच्या हिंसाचारावर RSS चे प्रमुख मोहन भागवत यांचं मोठं विधान

हेही वाचा-मृत्यूच्या 10 तासांनंतर घडला अजब चमत्कार, डॉक्टरही झाले हैराण

हेही वाचा-VIDEO: नजर हटी, दुर्घटना घटी; भरधाव ट्रकच्या धडकेत बाईकचा चुराडा, तिघांचा मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2020 02:14 PM IST

ताज्या बातम्या