मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

इस्रायलच्या कंपनीने तयार केला Miracle मास्क, 99 टक्के कोरोना व्हायरसचा करतो खात्मा!

इस्रायलच्या कंपनीने तयार केला Miracle मास्क, 99 टक्के कोरोना व्हायरसचा करतो खात्मा!

इस्रायलच्या Sonovia या कंपनीने खास फॅब्रिकपासून हा मास्क तयार केला आहे. त्यावर Zinc oxide nano-particles चं कोटिंग केलेलं आहे.

इस्रायलच्या Sonovia या कंपनीने खास फॅब्रिकपासून हा मास्क तयार केला आहे. त्यावर Zinc oxide nano-particles चं कोटिंग केलेलं आहे.

इस्रायलच्या Sonovia या कंपनीने खास फॅब्रिकपासून हा मास्क तयार केला आहे. त्यावर Zinc oxide nano-particles चं कोटिंग केलेलं आहे.

    जेरुसलेम 21 जून: कोरोना व्हायरसमुळे सर्व जग चिंताग्रस्त आहे. व्हायरसला रोखण्यासाठी जगभर संशोधन सुरू आहे. 190 पेक्षा जास्त देशांना याचा फटका बसला आहे. मात्र त्यावर रामबाण औषध अजुन निघालं नाही. मात्र व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी अनेक गोष्टी आता बाजारात येत आहेत. इस्रायलच्या Sonovia या कंपनीने हा खास मास्क केला असून हा मास्क 99 टक्के व्हायरसचा खात्मा करतो असा दावा Israel कंपनीने केला आहे. wionewsने या बाबतचं वृत्त दिलं आहे. इस्रायलच्या Sonovia या कंपनीने खास फॅब्रिकपासून हा मास्क तयार केला आहे. त्यावर Zinc oxide nano-particles चं कोटिंग केलेलं आहे. या कोटिंगमुळे 99 टक्के बॅक्टेरिया आणि व्हायरस निष्क्रिय होतात असा दावा कंपनीने केला आहे. चीनच्या शांघाई मधल्या Microspectrum लॅबमध्ये या मास्कचं परिक्षण करण्यात आलं आहे. या मास्कमुळे 90 टक्क्यांपेक्षा जास्त व्हायरस निष्क्रिय होतात असं म्हटलं आहे. कंपनीच्या तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख Liat Goldhammer यांनी असाही दावा केला की हॉस्पिटलमध्येही विविध उपकरणांसाठी याचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळेही 99 टक्के व्हायरसपासून बचाव केला जाऊ शकतो. मास्कमुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश येतं हे आता सिद्ध झालं असून अनेक देशांमध्ये घराबाहेर पडतांना मास्क वापणं सक्तिचं करण्यात आलं आहे. प्लाझ्मा थेरपीचं मोठं यश; आरोग्यमंत्री 24 तासांत आले ICU मधून बाहेर दरम्यान,  81 देशांमध्ये कोरोनाव्हायरसची दुसरी लाट सुरू (second wave of coronavirus) होत आहे. अनलॉकमुळे कोरोनाची प्रकरणं झपाट्याने वाढू लागल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) म्हटलं आहे. चीनमध्ये कोरोनाव्हायरसने पुन्हा डोकं वर काढलं. गेल्या काही दिवसांपासून राजधानी बीजिंगमध्ये नवीन प्रकरणं येऊ लागलीत. अमेरिका,पाकिस्तान, बांग्लादेश, इज्राइल, स्वीडन, दक्षिण आफ्रिका, ब्राजील इत्यादी देशांमध्ये कोरोना थैमान घालत आहे. फक्त 36 देशांमध्ये कोरोनाव्हायरसची प्रकरणं कमी झालीत. 'ही' 3 औषध कोरोनाला हरवणार, जाणून घ्या कोणत्या रुग्णांवर होणार उपचार आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस गेब्रेयसेस यांनी सांगितलं, "बहुतेक देशांमध्ये अनलॉकमुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. लोकं कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी असलेल्या नियमांचं उल्लंघन करत आहेत. मास्कही नीट लावत नाही. त्यामुळे या देशांमध्ये गेल्या काही आठवड्यात संक्रमण झपाट्याने वाढलं आहे" संपादन - अजय कौटिकवार    
    First published:

    Tags: Coronavirus, Isreal

    पुढील बातम्या