मराठी बातम्या /बातम्या /देश /

प्लाझ्मा थेरपीचं मोठं यश; आरोग्यमंत्री 24 तासांत आले ICU मधून बाहेर

प्लाझ्मा थेरपीचं मोठं यश; आरोग्यमंत्री 24 तासांत आले ICU मधून बाहेर

कोरोनाग्रस्त आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (satyendra jain) यांना प्लाझ्मा थेरेपी देण्यात आली आणि एका दिवसातच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

कोरोनाग्रस्त आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (satyendra jain) यांना प्लाझ्मा थेरेपी देण्यात आली आणि एका दिवसातच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

कोरोनाग्रस्त आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (satyendra jain) यांना प्लाझ्मा थेरेपी देण्यात आली आणि एका दिवसातच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

नवी दिल्ली, 22 जून : कोरोनाग्रस्त आरोग्यमंत्र्यांवर प्लाझ्मा थेरपी (plasma therapy) यशस्वी होताना दिसते आहे. प्लाझ्मा थेरेपी दिल्यानंतर दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Health Minister Satyendra Jain) यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. एका दिवसातच ते आयसीयूमधून बाहेर आलेत. आता त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना काही दिवसांपूर्वी ताप येत होता आणि श्वास घ्यायला त्रास होता होता. त्यांना राजीव गांधी सुपर स्‍पेशलियटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तपासणीत त्यांच्या फुफ्फुसात इन्फेक्शन झालं असल्याचं समजलं. यानंतर त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली. सुरुवातीला चाचणी निगेटिव्ह आली पण रुग्णालयात केलेली दुसरी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर पुढील उपचारासाठी साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये (Max Hospital) त्यांना हलवलं. तिथे त्यांना कोविड-19 ( COVID-19)साठी प्लाझ्मा थेरेपी देण्यात आली. हे वाचा - धनंजय मुंडेंनी कोरोनाला हरवलं, रुग्णालयातून बाहेर पडतानाचे EXCLUSIVE PHOTOS प्लाझ्मा थेरपीनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं दिसत आहे. त्यांच्या फुफ्फुसांमधील इन्फेक्शन कमी झालं आहे. आता त्यांना ऑक्सिजन सपोर्टवरून काढण्यात आलं आहे. प्लाझ्मा थेरेपीनंतर आरोग्यमंत्र्यांच्या प्रकृतीत झालेली सुधारणा म्हणजे प्लाझ्मा थेरपीचं मोठं यश आहे. काय आहे प्लाझ्मा थेरपी? डॉक्टरांनी सांगितलं की, जो रुग्ण 3 आठवड्यांपूर्वी बरा झाला आहे, त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा घेतले जातात. एका व्यक्तीच्या रक्तातून जास्तीत जास्त 800 मिलीलीटर प्लाझ्मा घेतलं जाऊ शकतो, तर कोरोना रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज टाकण्यासाठी 200 मिलीमीटर प्लाझ्मा चढवलं जातं. हे वाचा - COVID-19: पोलिसांवर कोरोनाचं संकट, 24 तासांत 55 जवानांना बाधा; संख्या गेली 4,103 दिल्लीतील एम्सचे रणदीप गुलेरिया म्हणाले, "कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. रुग्ण बरा झाल्यानंतरही त्याच्या रक्तात या अँटिबॉडीज कायम असतात. अशा व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा कोरोना रुग्णाच्या शरीरात सोडले जातात. जेणेकरून त्या प्लाझ्मातील अँटिबॉडीद रुग्णाच्या शरीरातील व्हायरसशी लढतील" संपादन - प्रिया लाड हे वाचा - कोरोनाचा धोका! झोपडपट्टी नाही तर आता बहुमजली इमारतींनी वाढवली चिंता
First published:

Tags: Coronavirus, Satyendra Jain

पुढील बातम्या